शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाच्या रकमेपासून वंचित

By admin | Updated: January 25, 2015 23:16 IST

घरगुती गॅस ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना (डीबीटीएल) अपयशी तर ठरणार नाही, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

घरगुती गॅस ग्राहक त्रस्त : सर्व्हर फेल झाल्याने नुकसानगोंदिया : घरगुती गॅस ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना (डीबीटीएल) अपयशी तर ठरणार नाही, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. मागील २५ दिवसांपासून अनेक ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा न झाल्याने या प्रकाराला आता बळ मिळत आहे.डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना (डीबीटीएल) पुन्हा एकदा सुरू केल्यानंतर यात अनेक अडचणी येत आहेत. देवरी येथे २० दिवसांपूर्वी ज्यांनी गॅससाठी रक्कम देवून सिलेंडर घेतले, त्यांच्या बँक खात्यात अद्यापही अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. अनेक गॅस ग्राहकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा शासनाचा अन्याय असून अशा पद्धतीने रक्कम दिल्यावर त्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात यावी, असे या ग्राहकांचे म्हणणे आहे. गॅसची देय रक्कम भरल्यावर त्याच दिवशी ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात यावी, असा नियमसुद्धा आहे. देवरी येथील एच.पी. गॅस देवरी फ्लैम्सच्या कार्यालयात संपर्क साधल्यावर तेथे कार्यरत विशाल नामक कर्मचाऱ्याने सांगितले की, मागील २० दिवसांपासून ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नाही, हे सत्य आहे. ही बाब संगणकावर उपलब्ध नेटवर आॅप्शन बघितल्यावर माहीती झाली. आता अनुदानाच्या रकमेसाठी तिकीट लॉक करावे लागेल किंवा आॅनलाईन संदेश पाठविणे आवश्यक आहे, ही बाब आज माहीती झाली आहे.मात्र आता ज्यांच्या अनुदानाची रक्कम थांबलेली आहे त्यांना आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, ग्राहकांच्या बँक खात्यात पाच-सहा दिवसांतच अनुदानाची रक्कम जमा होणे गरजेचे आहे. परंतु जर सर्व्हर फेल झाले असेल किंवा बँक खाते क्रमांक चुकीचे असेल तर या कालावधीत अनुदान जमा होवू शकणार नाही. जर २० दिवस लोटूनही अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर याचा अर्थ सर्व्हर फेल झाले असेल, असा होतो. असे झाल्यास १५ दिवसांच्या नंतरच सदर रक्कम बँक खात्यात जमा होवू शकेल. त्यासाठी विलंब झाल्याच्या परिस्थितीत ग्राहकांना २० ते २५ दिवस वाट पहावी लागेल. (प्रतिनिधी)