शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

केशोरी परिसरात रोहयोची कामे सुरु करण्याची मागणी

By admin | Updated: November 15, 2014 22:50 IST

अर्जुनी/मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या केशोरी परिसरात प्रामुख्याने धानपीक घेण्यात येते. धानाची तोडणी व मळणी झाल्यानंतर मजूर वर्गाना परिसरात कामे राहत नसल्यामुळे मजूर वर्ग

केशोरी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या केशोरी परिसरात प्रामुख्याने धानपीक घेण्यात येते. धानाची तोडणी व मळणी झाल्यानंतर मजूर वर्गाना परिसरात कामे राहत नसल्यामुळे मजूर वर्ग इतरत्र कामासाठी भटकंती करतांना दिसतात.मागील वर्षी प्रशासकीय मंजुरी प्राप्त असलेल्या कामांना सुरूवात झाल्यास मजुरांचा, बेरोजगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल. केशोरी परिसरातील रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी मजुरांनी केली आहे.या परिसरात नोंदणीकृत कुटुंबाची संख्या भरपूर आहे. या परिसरातील अनेक मजुरांची बँकेत खाते देखील काढण्यात आली आहेत. काही मजूरांनी पोष्टात देखील खाती उघडली आहेत. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार या भागात २१ कामांना मंजुरी मिळून प्रलंबित पडली आहेत. प्रलंबित असलेल्या या कामांना सुरुवात झाली तर या परिसरातील स्थानिक मजूराच्या हाताला काम मिळेल, तलाव, बोडी, खोलीकरण, विहीरी, वृक्ष लागवड, रस्ता रुंदीकरण इत्यादी कामांंना सुरूवात झाल्यास रोजगार हमी योजनेंतर्गत गावातील विकास कामे होण्यास मदत होईल. मात्र याकडे शासकीय कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.प्रशासनाचे ग्रामसेवक, कृषी विभाग, वन विभाग रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास अकार्यक्ष दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे. नोंदणीकृत मजुरांना त्वरीत कामे मिळण्याचे उद्देशाने या परिसरात रोजगार हमीची कामे सुरू करावी, अशी मागणी मजूर वर्गानी केली आहे. मजूरांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारांचा लोंढा शहराकडे धाव घेत आहे. (वार्ताहर)