विद्युत ट्रान्सफाॅर्मर लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:28 AM2021-04-10T04:28:45+5:302021-04-10T04:28:45+5:30

गौण खनिज चोरीकडे दुर्लक्ष! सडक-अर्जुनी : महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतील गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे; परंतु ...

Demand for installation of power transformers | विद्युत ट्रान्सफाॅर्मर लावण्याची मागणी

विद्युत ट्रान्सफाॅर्मर लावण्याची मागणी

Next

गौण खनिज चोरीकडे दुर्लक्ष!

सडक-अर्जुनी : महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतील गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे; परंतु महसूल विभाग केवळ रेती तस्करांच्या मागावर असतात. त्यामुळे मुरूम, दगड चोरट्यांना रान मोकळे असल्याचे दिसून येत आहे.

नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी

अर्जुनी-मोरगाव : सांडपाण्याचा निचरा होत नाही; पण अजूनही नगरपंचायत प्रशासनाचे नाली स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. नाल्या केरकचऱ्याने भरल्या आहेत. त्यातून सांडपाण्याचा निचरा होत नाही. नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी आहे. नगरपंचायत प्रशासन आणि नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष

आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई होत नाही. ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त

तिरोडा : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे डासांचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. हिवतापासारख्या आजाराची शक्यता आहे.

चुलोद रस्ता ठिकठिकाणी उखडला

गोंदिया : शहराला लागून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम चुलोदला जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. ग्राम चुलोद हद्दीत काही शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा असते, शिवाय चुलोद व लगतच्या गावातील नागरिक काम व व्यवसायानिमित्त दररोज गोंदियात येतात. मात्र, रस्ता उखडल्यामुळे अपघातांची शक्यता बळावली आहे.

कॉलनीत नाली बांधकामाची मागणी

गोंदिया : शहरातील विवेकानंद कॉलनीत नाल्यांचे बांधकाम नसल्याने कित्येकांच्या घरासमोर पावसाचे पाणी साचून राहते. अशात कित्येकदा चिखलात घसरून नागरिक घसरून पडले आहेत. नगरपरिषदेने घरासमोर नाली बांधकाम केल्यास पावसाचे पाणी त्यातून निघून जाणार.

भटक्या समाजाची समस्या संपता संपेना

आमगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीप्रमाणे लोहार समाज भटकंती करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे. यासाठी गावोगावी फिरून मिळालेल्या पैशांतून ते आपला उदरनिर्वाह करतात.

ग्रामीण भागातील आरोग्यसेवा रामभरोसे

गोरेगाव : ग्रामीण भागातील आरोग्यसेवक, कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णांची मात्र अशात अडचण होत आहे.

तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच

सडक-अर्जुनी : राज्य शासनाच्या तंटामुक्त गाव अभियान योजनेला गावागावातील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागल्याने या अभिनव योजनेचा फज्जा उडाला आहे.

दिवसाही सुरू असतात पथदिवे

गोंदिया : जिल्हास्थळ असलेल्या गोंदिया शहरात नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगर परिषदेला नाहकच अधिकच्या विजेचा भुर्दंड सोसावा लागतो.

दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

गोंदिया : येथील रेल्वे स्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंध पसरतो. त्यामुळे या परिसरात घाणच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा

गोंदिया : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ग्राहक, व्यापाऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे.

Web Title: Demand for installation of power transformers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.