शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तापमानात घट - उकाडा मात्र कायम

By admin | Updated: June 4, 2014 00:10 IST

२५ मे पासून सुरू असलेला नवतपा कसा तरी सरला असून यानंतर तापमानात घट झाली आहे. असे असतानाही मात्र उकाडा अद्याप कायम असून जीव आताही कासावीस होत आहे. तापमानात घट झाली

गोंदिया : २५ मे पासून सुरू असलेला नवतपा कसा तरी सरला असून यानंतर तापमानात घट झाली आहे. असे असतानाही मात्र उकाडा अद्याप कायम असून जीव आताही कासावीस होत आहे. तापमानात घट झाली तरीही उन्हाची तीव्रता काही कमी होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून  उकाड्यापासून मुक्तता मिळावी यासाठी नागरिक आता पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. यंदाच्या उन्हाळ्य़ात मार्च व एप्रिल महिन्यात थोडी फार पावसाची रिमझिम झाली. यामुळे काही दिवस तापमान कमी जाणवले मात्र त्यानंतर रविराज चांगलेच तापले व आता काही शांत होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच जिल्ह्याचा पार ४२ ते ४३ डिग्रीच्या घरात गेला होता. एवढय़ा तापमानात जीव कासावीस होऊ लागल्याने सर्वांनाच एक-एक दिवस जड होऊ लागला. त्यात उन्हाळ्याचा खरा महिना म्हणजे मे महिना असतो. मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच सूर्यदेवाने आपला कोप दाखविला. त्यात महिन्याच्या शेवटी २५ मे पासून नवतपा सुरू झाला व तापमानाने हद करून टाकली. यंदाच्या नवतपात तर जिल्ह्यातील तापमानाचा पारा चांगलाच वर चढला. ४५ डिग्रीच्या घरात गेलेल्या तापमानाने जिल्हावासी होरपळून गेले होते. उन्हाला बघता शहरात अघोषित संचारबंदीसदृश स्थिती दुपारच्या वेळी बघावयास मिळत होती. नवतपाचे नऊ दिवस अशा प्रकारेच चांगले तापले व उष्णतेची लाटच अवघ्या विदर्भात पसरल्याचे दिसून येऊ लागले. आता नवतपा संपला असून त्यानुसार सूर्यदेवाचा कोपसुद्धा काही प्रमाणात कमी झाल्याचे बघावयास मिळत आहे. नवतपा संपताच उष्णतेची लाट कमी झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे तापमानातही घट झाली आहे. नवतपात रात्रीच्या वेळी अंगाला चटके लागायचे व उष्ण वारे वाहत असल्याचा अनुभव यंदा मिळाला. मात्र नवतपा सरताच वातावरण बदलले. रात्रीला थोड्या फार प्रमाणात थंड वारे वाहत आहेत. असे असताना मात्र दिवस तसाच कठीण जात आहे. तापमानात घट झाली असली तरीही उकाडा काही कमी झालेला नाही. यामुळे नागरिकांची पंचाईत अद्याप संपलेली नाही. उन्हाचे चटके आजही लागत असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कित्येक तर दिवसा बाहेर निघणे टाळत आहेत. यामुळे दुपारच्या वेळी  अघोषित संचारबंदी दिसून येते. सायंकाळी कसे तरी नागरिक आपले दिवसभराचे काम आटोपायला निघतात. आता लोकांची सहनशीलता संपली असून कधी पाऊस पडतो व या उकाड्यापासून मुक्तता मिळते याची वाट सर्वच बघत आहेत.  (शहर प्रतिनिधी)