शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील बालमृत्यू दरात घट

By admin | Updated: May 6, 2016 01:26 IST

बालमृत्यूने नेहमी गाजणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी बालमृत्यूदर काही प्रमाणात कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.

८.१ टक्क्यांनी कमी : उपजत मृत्यूदरही ३.७९ टक्क्यांनी घटलानरेश रहिले गोंदियाबालमृत्यूने नेहमी गाजणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी बालमृत्यूदर काही प्रमाणात कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बालकांच्या मृत्यूची संख्या १७४ ने घटली आहे. आता आदिवासी व नक्षलग्रस्त भागातही जनजागृती होत आहे. सन २०१४-१५ या वर्षात बालमृत्यूची संख्या ५४५ होती, परंतु सन २०१५-१६ या वर्षात ३७१ बालमृत्यू झाले आहेत. उपजत मृत्यूमध्येही ३.७९ टक्क्यांनी घट आली आहे.गेल्या १५ वर्षापूर्वीच्या जन्म व बालमृत्यूची आकडेवारी पाहिल्यास आता मृत्यूदर बराच कमी झाल्याचे दिसून येते. सन २०००-०१ मध्ये जिल्ह्यात ७२० बालकांचा मृत्यू झाला होता. २००८-०९ मध्ये ४८८, सन २०१४-१५ या वर्षात शुन्य ते ६ वर्षातील ५४५ बालकांचा मृत्यू झाला. परंतु सन २०१५-१६ या वर्षात बालमृत्यू दरात घट होऊन ३७१ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यात ग्रामीण भागात २१९ तर शहरी भागात १५२ बालमृत्यू झाले आहेत.१ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांच्या मृत्यूचा आकडा आता कमी झाला आहे. सन २००० मध्ये १३४ बालकांचा मृत्यू झाला होता. या वयोगटातील सर्वाधिक १७९ बालक २००३-०४ मध्ये दगावले होते. सन २००६-०७ नंतर बालमृत्यूच्या आकड्यात घट झाली. सन २०१४-१५ मध्ये १ ते ६ वर्ष वयोगटातील ६० बालकांचा मृत्यू झाला होता. यावर्षी ही संख्या ५१ वर आली आहे.यात ग्रामीण भागातील ४७ तर शहरी भागातील ४ बालकांचा समावेश आहे. असे झाले फायदेजननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत देण्यात येणारी सेवा उत्तम असल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली. नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे आरोग्य संस्थेतच प्रसूती करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारली आहे.गंगाबाईवर लक्ष केंद्रीत कराजिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात सर्वात जास्त प्रसूती करण्यात गंगाबाईचा दुसरा क्रमांक आहे. परंतु पाहिजे त्या प्रमाणात या रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध नाहीत. आरोग्य सेविका, परिचर नाहीत. तुटपुंज्या मनुष्यबळावर वर्षाकाठी सात हजारापेक्षा अधिक प्रसुती एकट्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात होतात. त्यासाठी शासनाने गंगाबाई स्त्री रूग्णालयाकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी शासन दरबारी आपले वजन खर्ची घालावे अशी अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत.आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंदात प्रसुती करण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु एनबीसीसी (न्यू बोर्न केयर सेंटर) मधून सात दिवसात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात एसएनसीयू (सिवर न्यू बोर्न केयर युनिट) असल्यामुळे बाल मृत्यूदरात घट झाली आहे.-डॉ.संजीव दोडकेवैद्यकीय अधीक्षक, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय गोंदिया.