खळबंदा जलाशयात बुडून दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 15:53 IST2018-12-26T15:52:40+5:302018-12-26T15:53:05+5:30
आमदार विजय रहागडांले हे घटनास्थळी खळबंदा जलाशयावर पोहोचले.

खळबंदा जलाशयात बुडून दोघांचा मृत्यू
गोंदिया : भारतीय जनता पार्टी दवनीवाडा मंडळाचे अध्यक्ष धनेंद्र अटरे यांच्या मुलासह एकाचा खळबंदा जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये कृष्णकुमार धनेंद्र अटरे (वय 18, रा.पारडीबांध) व धर्मेंद्र पुलूलाल लिल्हारे (वय.21) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार विजय रहागडांले हे घटनास्थळी खळबंदा जलाशयावर पोहोचले.
गंगाझरी पोलिसांनीही लगेच यंत्रणा कामाला लावत दोघांचेही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.