शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या खरेदीसाठी उसळली गर्दी

By admin | Updated: October 31, 2015 02:35 IST

दिवाळी आता जेमतेम १-१२ दिवसांवर येऊन ठेपली असताना दिवाळीच्या खरेदीसाठी गोंदियावासीयांनी बाजारात गर्दी केली आहे.

बाजारपेठ हाऊसफुल्ल : कपड्यांच्या खरेदीवर सर्वाधिक उड्यागोंदिया : दिवाळी आता जेमतेम १-१२ दिवसांवर येऊन ठेपली असताना दिवाळीच्या खरेदीसाठी गोंदियावासीयांनी बाजारात गर्दी केली आहे. सध्या कपड्यांच्या खरेदीवर सर्वाधिक जोर दिसत असल्याने बाजारातील कापड व्यवसायिकांची दिवाळी आतापासूनच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. वाढत्या गर्दीमुळे बाजारात पाय ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही गर्दी अशीच वाढत जाणार आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. या सणाला महालक्ष्मी पूजेसाठी नवे वस्त्र परिधान केले जाते. यामुळे नव्या कपड्यांनाही तेवढाच मान असल्याने नवीन कापडांची खरेदी केली जाते. दिवाळीनिमित्त येणारे कापडांचे नवे स्टॉक बघून बाजारात गोंदियाकरांची गर्दी वाढली आहे. आजघडीला दुकानांमध्ये पाय ठेवायला जागा नाही तर रस्त्यांवर गाड्या ठेवायला जागा नसल्याचे दिसून येते. या वाढत्या गर्दीमुळे बाजारपेठेतील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. गोंिदयाच्या बाजाराची परिसरासह लगतच्या राज्यांपर्यंत ख्याती असल्याने कापडांच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येत नागरिक व व्यापारी गोंदियात येतात. याचा अधिकचा फायदा येथील कापड व्यवसायीकांना मिळतो. गोंदियाच्या बाजारात ६० टक्के कापडांचा व्यापार आहे. यात रेडिमेडचा बोलबाला अधिक प्रमाणात दिसून येतो. विशेष म्हणजे दिवाळीच्या या धामधूमीत जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे खेचून यावे या दृष्टीने कापड व्यवसायिकांकडून सेल व ईनामी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)सरकारी नोकरीवाल्यांचीच खरी दिवाळी वाढत्या महागाईने कळस गाठला आहे. त्यात यंदा पावसाने दगा दिल्याने धान पिक कमी प्रमाणात आले आहे. त्याच धान खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. अशात सर्वसामान्य माणसांसह शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. खायचे वांदे असताना दिवाळी कुठून साजरी करायची, असा प्रश्न शेतकरी व सर्वसामान्यांना सतावत आहे. अशात सरकारी नोकरीवर असलेल्यांचीच ही दिवाळी दिसून येत आहे. सरकारी नोकरीत असल्याने मोठा पगारदार वर्ग सध्या खरेदीला लागल्याचे दिसते. युवा वर्गाची जीन्स-फॉर्मलला पसंती आजच्या या फॅशनच्या दुनियेत युवा पिढीच्या आवडी निवडीला घेऊन वेगवेगळ््या कंपन्या वेगवेगळ््या प्रकारचे कपडे तयार करीत आहेत. तरूणांची जीन्सला जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. तरूणांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वच जीन्स घालतात. मात्र कार्यालयीन कामकाजात जीन्स सूट होत नसल्याने युवकांचा कल फॉर्मलकडे दिसतो. जास्त भर रेडीमेड कापडांवर दिला जात आहे. बाजारातील विविध दुकानांत ५०० रूपयांपासून ३००० हजारापर्यंतचे जीन्स उपलब्ध आहेत.