शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीअभावी शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2015 02:45 IST

खरिपाच्या धानाची कापणी जोमात सुरू असून दिवाळीच्या तोंडावर खरिपाचे धान बाजारात येत आहे.

ठिकठिकाणी अडचण : रहांगडाले यांनी पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्रतिरोडा : खरिपाच्या धानाची कापणी जोमात सुरू असून दिवाळीच्या तोंडावर खरिपाचे धान बाजारात येत आहे. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात आपला धान व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. करिता कृषी उत्पन्न बाजार समिती व सेवा सहकारी समिती परिसरात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. यावर्षी धानपिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव अत्याधिक प्रमाणावर झालेला आहे. जरी उत्पादन जास्त प्रमाणात दिसत असले तरी अनियमित व कमी पावसामुळे धानात दाना न भरल्यामुळे टरफलाचे प्रमाण अधिक आहे. बाजारपेठेत धानाला भाव मिळत नसल्याने कमी दरात शेतकऱ्याला धान विकणे भाग पडत आहे. म्हणूनच शेतकऱ्यांकरिता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे अशा आशयाचे पत्र आमदार रहांगडाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले तर शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजारात धानाचे भाव न मिळाल्यास तिथेच असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकणे सोईचे होणार. शिवाय गावोगावी असलेल्या सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून आधारतूत धान खरेदी केंद्र असल्यास शेतकऱ्यांचा वेळ व वाहतूक खर्च कमी होईल. शेतकऱ्यांचे शोषण थांबविता येईल व योग्यभाव तसेच न्याय मिळेल, असेही आमदार रहांगडाले यांनी या पत्रात सुचविले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री गोंदियाला येऊन गेलेत तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात या पत्राचा आवर्जुन उल्लेख केला व अंमबलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.पांढरी : परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची लागवड केली जाते. सध्या हलक्या धानाच्या कापणी व मळणीचे काम सुरू असून बहुतेक शेतकऱ्यांनी कापणी करून पुंजणे रचले आहेत. पण अचानक वातावरण बदलामुळे पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बहुतेक शेतकरी आपल्याकडील साधन व यंत्रांच्या माध्यमातून मळणी करीत आहेत. परंतु शासनाने या परिसरामध्ये धान खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांना कवळीमोल भावात व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे. हेच व्यापारी ते धान आधारभूत केंद्र सुरू झाल्यावर अधिक भावात विक्री करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहेत.या परिसरातील भुमिपुत्र म्हणून ओळखणारे जनप्रतिनिधी सध्या सत्ता हातामध्ये असतानी लुप्त झाले आहेत. आज शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे. त्यांच्यासाठी संघर्ष न करता फक्त मतांसाठी खोटी आश्वासने देऊन गप बसल्याचे दिसत आहे. मात्र शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी धावाला योग्य भाव देऊन आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करावे अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.गोठणगाव : परिसरातील हलक्या धानाच्या कापणी मळणीचे काम जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने अनेक रोगराईपासून धानाचे संरक्षण केले आहे. पुढे दिवाळी येत असल्याने शेतकऱ्यांनी कामाला गती आणली आहे. त्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र, आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गोठणगाव येथे सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.