शेतकऱ्यांच्या पोळा सणावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:13+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोळा घरीच साजरा करून बैलांना पोळ्यात घेवून जाऊ नका आणि बैलांची पूजा घरीच करायची आहे. या आदेशाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जून व जुलै महिन्यात रोवणीचे काम आटोपून श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा मोठ्या थाटात शेतकरी साजरा करतात. बैलांना सजवून त्यांचे मालक आपली जोडी घेवून तोरणात जातात.

Coronation at the farmers' hive festival | शेतकऱ्यांच्या पोळा सणावर कोरोनाचे सावट

शेतकऱ्यांच्या पोळा सणावर कोरोनाचे सावट

ठळक मुद्देसाधेपणाने साजरा करण्याचे आदेश : शेतकऱ्यांत निरूत्साहाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा बुजरुक : शेतकऱ्यांचा साथीदार बैलांच्या पोळा सणावर सातत्याने कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशी अनेक संकटे पाहावयास मिळतात. तर यावर्षी कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे पोळावर संकट आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोळा घरीच साजरा करून बैलांना पोळ्यात घेवून जाऊ नका आणि बैलांची पूजा घरीच करायची आहे. या आदेशाने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जून व जुलै महिन्यात रोवणीचे काम आटोपून श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा मोठ्या थाटात शेतकरी साजरा करतात. बैलांना सजवून त्यांचे मालक आपली जोडी घेवून तोरणात जातात.
गावच्या चौकात गावातील सर्व शेतकरी व ग्रामस्थ एकत्र येवून एकमेकांना आलींगन देत गळा भेट घेतात. बैलांची पूजा व झळत्या म्हणून बैलांचे लग्न लागायचे. परंतु कोरोनामुळे पोळावर सुद्धा विरजन पडले. कोरोणामुळे शेतकऱ्यांचे व ग्रामीण भागातील जनतेचे मोठे नुकसान झाले. रोजगार संपले व हाताला काय नाही तर पैसा कुठून येणार.
पोळानिमित्त बाजारपेठा सजल्या असल्या तरिही शेतकरी रिकामा असल्याने आपल्या सर्जा-राजासाठी काही घेऊही शकत नाही. बाजारातील साहित्ये विक्रेते सुद्धा चिंतेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यंदा सामूहिक पोळा भरणार नाही यामुळेही शेतकरी निरुत्साही आहे. कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट उपसणाºया सर्जा-राजाचा पोळा यंदा मंगळवारी (दि.१८) आहे. वर्षभर राबराब राबणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस शेतकऱ्यांसाठी खुप महत्वाचा असतो.
एक दिवस आधी बैलांना आंघोळ करुन त्याची पूजा करुन पिठाचे लाडू खायला दिले जाते त्याला मोहबैल असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी बैलांना सजवून त्याची ओवाळणी करुन मनोभावे पूजा केली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला जसा फटका बसला तसाच किंबहूना सर्वाधिक फटकाही शेतीला बसला आहे. कोरोनामुळे सर्वांचेच अर्थचक्र बिघडले आहे. त्यात शेतकरी देखील अपवाद नाही.

Web Title: Coronation at the farmers' hive festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी