शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी खुर्द येथील कोरोना दक्षता विभाग कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

तिरोडा तालुक्यात परदेशातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १६ जण परदेशातून आले असल्याचे सांगितले. पण येणाºयांची संख्या जास्त आहे. प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. एकही चमू ग्रामीण भागात सर्व्हेक्षण करताना दिसत नाही. काही ठिकाणी खदानीचे काम सुरु आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । खाट व कर्मचारी उपलब्ध नाही: व्यवस्था वऱ्यावरच

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील ग्राम चांदोरी खुर्द येथील नवीन इमारतीत कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग सुरु करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहे. त्यानुसार, तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात ५ खाटांचे विलगीकरण तात्पुरते करण्यात आले आहे. पण चांदोरी खुर्द येथील नवीन इमारत रिकामी असल्याने येथे १३ खाटांचे विलगीकरण अतिदक्षता विभाग सुरु करण्याचे ठरविले व सुरु झाल्याचे प्रशासनाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल मोहने यांनी दिली. मात्र ३ दिवसाचा काळ लोटला तरी त्यात एक खाट ही लावण्यात आले नाही व साधा एक कर्मचारीही नाही अशी आरोग्य विभागाची व्यवस्था दिसून येत आहे.तिरोडा तालुक्यात परदेशातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १६ जण परदेशातून आले असल्याचे सांगितले. पण येणाºयांची संख्या जास्त आहे. प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. एकही चमू ग्रामीण भागात सर्व्हेक्षण करताना दिसत नाही. काही ठिकाणी खदानीचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी मजूर एकत्र काम करतात. पण खबरदारीचा उपाय म्हणून साधे माक्स ही किंडगीपार येथील दगड खदानीतील मजुरांना दिलेले नाही.चांदोरी उपकेंद्रात कोरोना विलगीकरणाची व्यवस्था झाली नसून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.एकीकडे शासन मोठ्या प्रमाणात कोरोनापासून दूर राहून काळजी घेण्यास गावागावात उपाय करुन नागरिकांना मदत व सहकार्य करीत आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय सेवा देणारेच दुर्लक्ष करीत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी वरिष्ठ अधिकाºयांकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस