शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधित रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

विशेष म्हणजे तोपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पसार झाला असल्याची माहिती येथील व्यवस्थापनालाच नव्हती. यावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आरोग्य यंत्रणा कोरोना संक्रमण काळात किती सजग आहे दिसून येते. पळून गेलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा आरोग्य विभागाचा कर्मचारी असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देआरोग्य प्रशासनच अनभिज्ञ : तो कर्मचारी आरोग्य विभागाचाच, अनागोंदी कारभार कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्ण येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पळाल्याची घटना मंगळवारी (दि.४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पण हा रुग्ण पळल्याची माहिती येथील रुग्णालय प्रशासनाला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.तिरोडा येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र २ ऑगस्ट रोजी त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले होते. नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल केल्यानंतर तेथून तो पळून आला होता. यानंतर पुन्हा त्याच्या नातेवाईकांनी त्याला १०८ या रूग्णवाहिकेने मंगळवारी सकाळी ८ वाजता गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. परंतु तो कर्मचाऱ्यांची नजर चुकवून वैद्यकीय महाविद्यालयातून पसार झाला. दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी हा रुग्ण तिरोडा परिसरात आला असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका डॉक्टरला फोन करुन दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.विशेष म्हणजे तोपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पसार झाला असल्याची माहिती येथील व्यवस्थापनालाच नव्हती. यावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आरोग्य यंत्रणा कोरोना संक्रमण काळात किती सजग आहे दिसून येते. पळून गेलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा आरोग्य विभागाचा कर्मचारी असल्याची माहिती आहे. दरम्यान तिरोड्याजवळ हा रुग्ण आढळला असून त्याला परत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यासाठी आरोग्य विभागाने सूत्रे हलविल्याची माहिती आहे. याप्रकरणा संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. रुखमोडे यांना विचारणा केली असता त्यांनी याप्रकरणाची चौकशी करुन सांगतो असे सांगितले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या