शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशासनाला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

पोलीस ठाण्यात रविवारी (दि.१३) घेण्यात आलेल्या गावातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला सरपंच अनिरु द्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, शैलेश जायसवाल, संजय उजवणे व प्रतिष्ठित उपस्थित होते.

ठळक मुद्देदिनकर ठोसरे : गावकऱ्यांच्या बैठकीत कोरोना विषयक मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : ‘लॉकडाउन’ व संचारबंदी आपल्या हितासाठी करण्यात आली आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रतिपादन ठाणेदार दिनकर ठोसरे यांनी केले आहे.पोलीस ठाण्यात रविवारी (दि.१३) घेण्यात आलेल्या गावातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला सरपंच अनिरु द्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, शैलेश जायसवाल, संजय उजवणे व प्रतिष्ठित उपस्थित होते.बैठकीत कोरोनाचा गावात प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावातील सर्व नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, घराबाहेर जाताना रुमाल किंवा मास्कचा वापर करावा, शेतातील कामे करताना प्रत्येक मजुरामध्ये १ मीटर अंतर असावे, गावात अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी वाहनांनी फिरू नये, गावातील सर्व बांधकाम बंद करण्यात यावे, स्वस्त धान्य दुकान, बँक व दुकानात खरेदी करताना सामाजिक अंतर राखावे, गावाबाहेरील व्यक्ती आल्यास ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, आरोग्य विभाग, तलाठी कार्यालयात नोंद करावी, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप, स्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत या व्यक्तीचे नाव आरोग्य विभागाकडे कळवून रुग्णालयात नेण्यात यावे, कोणत्याही सामाजिक, धार्मिक सण व कार्यक्रमांत पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीत येणार नाही याची दक्षता घ्यावी, लहान मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडू नये आदि बाबींवर चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्या राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.सर्वच गावकऱ्यांनी या निर्णयांची वैयिक्तक पातळीवर अंमलबजावणी करावी, अन्यथा मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४, रोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील खंड २,३,४ चे तरतुदी नुसार निर्णयाचा भंग करणाºयांवर कार्यवाही करण्यात येईल. तसेच दंड आकारण्यात येईल याची सर्व नागरिकांनी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दुकानदारांनी नोंद घेण्याची सूचना ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आली आहे. गावातील नागरिक व दुकानदारांनी सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत खरेदी-विक्री करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या