पोलीस प्रशासनाला सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:08+5:30
पोलीस ठाण्यात रविवारी (दि.१३) घेण्यात आलेल्या गावातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला सरपंच अनिरु द्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, शैलेश जायसवाल, संजय उजवणे व प्रतिष्ठित उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाला सहकार्य करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : ‘लॉकडाउन’ व संचारबंदी आपल्या हितासाठी करण्यात आली आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रतिपादन ठाणेदार दिनकर ठोसरे यांनी केले आहे.
पोलीस ठाण्यात रविवारी (दि.१३) घेण्यात आलेल्या गावातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला सरपंच अनिरु द्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, शैलेश जायसवाल, संजय उजवणे व प्रतिष्ठित उपस्थित होते.
बैठकीत कोरोनाचा गावात प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावातील सर्व नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, घराबाहेर जाताना रुमाल किंवा मास्कचा वापर करावा, शेतातील कामे करताना प्रत्येक मजुरामध्ये १ मीटर अंतर असावे, गावात अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी वाहनांनी फिरू नये, गावातील सर्व बांधकाम बंद करण्यात यावे, स्वस्त धान्य दुकान, बँक व दुकानात खरेदी करताना सामाजिक अंतर राखावे, गावाबाहेरील व्यक्ती आल्यास ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, आरोग्य विभाग, तलाठी कार्यालयात नोंद करावी, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप, स्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत या व्यक्तीचे नाव आरोग्य विभागाकडे कळवून रुग्णालयात नेण्यात यावे, कोणत्याही सामाजिक, धार्मिक सण व कार्यक्रमांत पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीत येणार नाही याची दक्षता घ्यावी, लहान मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडू नये आदि बाबींवर चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्या राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्वच गावकऱ्यांनी या निर्णयांची वैयिक्तक पातळीवर अंमलबजावणी करावी, अन्यथा मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४, रोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील खंड २,३,४ चे तरतुदी नुसार निर्णयाचा भंग करणाºयांवर कार्यवाही करण्यात येईल. तसेच दंड आकारण्यात येईल याची सर्व नागरिकांनी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दुकानदारांनी नोंद घेण्याची सूचना ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आली आहे. गावातील नागरिक व दुकानदारांनी सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत खरेदी-विक्री करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.