ग्राहक दिन साजरा
By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:59+5:302016-03-20T02:13:59+5:30
येथील दुर्गा मंदिर परिसरात मंगळवारी जागतिक ग्राहक दिन थाटात साजरा करण्यात आला ...

ग्राहक दिन साजरा
रावणवाडी : येथील दुर्गा मंदिर परिसरात मंगळवारी जागतिक ग्राहक दिन थाटात साजरा करण्यात आला असून यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष अतुल आळशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, तहसीलदार संजय पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, ग्रामपंचायत सरपंच सूजीत येवले, उपसरपंच कैलाश कुंजाम, कौशल लिल्हारे, गणेश शरणागत, लीना गजभिये, मंजुलता जौंजाळ, सुरेखा बिसेन, सरीता न्यायकरे, कल्पना लिल्हारे, उर्मिला फसफसे, मानीकराम उके, खेमचंद हरिणखेडे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी ग्राहकांचे हक्क व अधिकारांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. आभार सेवई यांनी मानले. कार्यक्रमासाठी शेंडे व राजेश सोनवाने यांनी सहकार्य केले.