शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार ११२ रस्ते सभागृहांचे बांधकाम

By admin | Updated: April 24, 2015 01:39 IST

प्रदीर्घ काळानंतर गोंदिया जिल्ह्याला स्थानिक जनप्रतिनिधीचे पालकत्व मिळाले.

नवेगावबांध : प्रदीर्घ काळानंतर गोंदिया जिल्ह्याला स्थानिक जनप्रतिनिधीचे पालकत्व मिळाले. त्यामुळे पालकमंत्री राजकुमार बडोले हे विकासकामांना गती देतील, अशी अपेक्षा बाळगली जात होती. यानुरूप पालकमंत्री बडोले यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी सुचविलेल्या कामांना ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती ना.बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिली.जिल्ह्यात २५/१५ या लेखा शिर्षांतर्गत ४.५ कोटींच्या निधीतून जवळपास ११२ विकासांची कामे होणार आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात ४० विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात जुळणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होणे हे गरजेचे असते. यानुरूप जिल्ह्यातील आमदार व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राज्य शासनाकडे अनेक विकासातामक कामे सुचविली होती. याबाबत पालकमंत्री बडोले यांनी शासनाकडे पाठपुरावा करून कामांना मंजुरी मिळवून घेतली आहे. २५/१५ या लेखा शिर्षकाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ११२ रस्ते व सभागृहाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता राज्य शासनाच्या ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाने शासन निर्णय निर्गमित करून दिली आहे. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात गोरेगाव तालुक्यातील पाटेकुर्रा, सडक-अर्जुनी तालुक्यातील कोसमघाट, कोसमतोंडी, खोडशिवनी, फुटाळा, राका, मुंडीपार, चिखली, डोंगरगाव, डव्वा, पुतळी, चिंगी, कोहमारा, कोदामेढी, खुर्शीपार, तिडका, पांढरवाणी, पांढरी, परसोडी, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताळगाव, बोरी, तिडका, देवलगाव, निमगाव, भरनोली, राजोली, धाबेटेकडी, गवर्रा, बाक्टी, दाभना, देऊळगाव, गौरनगर, सिलेझरी, बोंडगाव, कोरंभीटोला, खामखुर्रा, इटखेडा, वडेगाव-रेल्वे व धाबेटेकडी-आदर्श या गावांसह देवरी तालुक्यातील ५८ लाखांची १७ कामे, आमगाव तालुक्यात १८ लाखांची ७ कामे, सालेकसा तालुक्यात २४ लाखांची ८ कामे, तिरोडा तालुक्यात ४६ लाखांची १५, गोरेगाव तालुक्यात ३० लाखांची ११ कामे व गोंदिया तालुक्यात ७१ लाखांची १४ कामे मंजूर झाली आहेत. ना. बडोले यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील ग्रामीण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात जुळणार आहे. (वार्ताहर)