शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला घ्यावी लागणार मेहनत

By admin | Updated: June 8, 2014 23:57 IST

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत गोंदिया विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. सलग दुसर्‍यांदा या मतदार संघातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार

मनोज ताजने - गोंदिया
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत गोंदिया विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. सलग दुसर्‍यांदा या मतदार संघातून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल आमदार झाले आहेत. परंतू आता परिस्थिती बरीच बदलली आहे. काँग्रेसचीच नाही तर सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदार संघावर पकड राहिलेली नाही, हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. दुसरीकडे भाजपची पकड वाढली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना गोंदिया विधानसभा मतदार संघात ८४ हजार मतांची आघाडी होती. त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड मानला जात होता. यावेळी ही मतांची आघाडी पूर्णपणे संपुष्टात येऊन भाजपच्या नाना पटोले यांनी या मतदार संघातून ५१0७ मतांची आघाडी घेतली. म्हणजेच गतवेळेच्या तुलनेत जवळपास ९0 हजार मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
हे परिवर्तन एकाएकी झाले किंवा केवळ ‘मोदी लाटे’मुळे झाले असेही म्हणता येणार नाही. साधारण अडीच वर्षापूर्वी झालेल्या गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवत ४0 पैकी १६ जागा जिंकल्या. शिवसेनेचेही ३ नगरसेवक निवडून आले.
याचवेळी राष्ट्रवादीला ११ तर काँग्रेसला अवघ्या ८ जागांवर समाधान मानावे लागले. दोन अपक्ष उमेदवारांच्या मदतीने काँग्रेस-राकाँने नगर परिषदेवर सत्ता काबीज केली असली तरी मतदारांचा कौल भाजपच्या बाजुने झुकल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले. त्यानंतरही गोंदिया शहरातील आणि या मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा, विकासात्मक कामांना मार्गी लावण्याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून झालेले दुर्लक्ष विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी इमानदारीने काम केले नसल्याची कुजबूज होती. त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
असे असले तरी विरोधकांसाठी ही निवडणूक सोपी आहे असेही नाही. भाजप-सेनेच्या युतीत ही जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे. दोन वेळा शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देणार्‍या या मतदार संघाने गेल्या सलग दोन निवडणुकीत पराभवही चाखायला लावला. शिवाय गेल्या पाच वर्षात शिवसेनेने पक्षवाढीसाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाही. त्यामुळे भाजप आपली या मतदार संघावरील पकड वाढल्याचा दावा करीत शिवसेनेकडून हा मतदार संघ आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे झाल्यास भाजपकडून या मतदार संघात कोणाला तिकीट मिळेल यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. कारण या मतदार संघात भाजपकडून लढण्यास इच्छुक असणार्‍यांची संख्या जास्त आहे. अशावेळी एखाद्याची नाराजी किंवा बंडखोरी या पक्षाला मारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व जर-तरच्या गोष्टी असल्या तरी आजच्या परिस्थिीतीत काँग्रेससाठी या मतदार संघात पोषक वातावरण राहिलेले नाही, हे मात्र मान्य करावेच लागेल.