शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढल्याने संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST

आमगाव : सध्या कोविशिल्डच्या दोन डोसमाधील अंतर ६ ते ८ आठवडे इतके होते. आता केंद्र सरकारच्या निर्णयानुसार कोविशिल्डच्या पहिल्या ...

आमगाव : सध्या कोविशिल्डच्या दोन डोसमाधील अंतर ६ ते ८ आठवडे इतके होते. आता केंद्र सरकारच्या निर्णयानुसार कोविशिल्डच्या पहिल्या डोसमधील अंतर वाढवून १२ आठवडे ते १३ आठवडे करण्यात आले. १२ ते १६ आठवड्यांनंतर चांगले रिझल्ट येत आहेत, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार लसीकरण करावे असे नवीन सूचना आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे शासन परिपत्रक सूचनेनुसार शनिवारी होणाऱ्या लसीकरणमध्ये आपण प्रथम डोस लसीकरण करावे, असे जिल्हा स्तरावरून सूचना प्राप्त आहेत. त्यामुळे ४५ च्यावर वर्षे असणाऱ्या लाभार्थ्यांना प्रथम डोस देण्यात येईल. शासनाच्या पत्रामध्ये दुसऱ्या डोसेचे लाभार्थी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करतील त्यांना लस देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. परंतु त्या करिता त्यांना आजच ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असून, ऑनलाइन लसीकरणाकरिता शुक्रवारच्या रात्री १२ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे काही नागरिकांना निराशा झाली आहे. लसीकरणाच्या दररोजच्या बदलत्या वेळापत्रकामुळे नागरिकांची धावपळ होत आहे. शनिवारी होणाऱ्या लसीकरण करिता ऑनलाइन रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही असे आरोग्य विभागाकडून दोन दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. आता पुन्हा शेड्युल बदलून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. व ज्यांचे प्रथम डोस घेऊन ६ ते ८ आठवडे पूृर्ण झालेत त्यांनी अजून किती वाट पाहावी? असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे.