शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै कृषी दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी कृषी संजीवनी मोहीम २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत तालुक्यातील गावा-गावांत शेतीशी निगडित विविध विषयांवर कृषी विभाग व आत्माअंतर्गत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आले.  तसेच कृषी संजीवनी  मोहिमेत तालुक्यात विविध गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांविषयी  तसेच  भात पीक, नर्सरीपासून, तर काढणी पश्‍चात तंत्रज्ञान  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रसार व प्रसिद्धीचे कार्यक्रम घेण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी व कृषी कर्मचाऱ्यांचा केला सत्कार : कृषी विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा :   तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक  यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात आला. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै कृषी दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी कृषी संजीवनी मोहीम २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत तालुक्यातील गावा-गावांत शेतीशी निगडित विविध विषयांवर कृषी विभाग व आत्माअंतर्गत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आले.  तसेच कृषी संजीवनी  मोहिमेत तालुक्यात विविध गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांविषयी  तसेच  भात पीक, नर्सरीपासून, तर काढणी पश्‍चात तंत्रज्ञान  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रसार व प्रसिद्धीचे कार्यक्रम घेण्यात आले. १ जुलैरोजी  पंचायत समिती सभागृह, तिरोडा  येथे कृषी संजीवनी मोहीम समारोपीय कार्यक्रम साजरा करण्यात आला.  उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अजय नष्टे होते. प्रमुख  पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी के. एन. मोहाडीकर, तिरोडा पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एम. गंगापारी, विस्तार अधिकारी अनुप भावे, कृषी अधिकारी वाय. बी. बावनकार, मंडळ कृषी अधिकारी पी. पी. खंडाईत, विस्तार अधिकारी भायदे, कुर्वे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाचे (आत्मा) उमेश सोनेवाने, अरविंद उपवंशी, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊराव कठाणे, धनेंद्र अटरे, सोनेवाने उपस्थित होते. प्रास्ताविकातून मोहाडीकर यांनी, कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत केलेल्या प्रचार प्रसिद्धीबाबत  पावर पॉईंट प्रेजेंनटेशन मान्यवर व शेतकऱ्यांना दाखविले. आमदार रहांगडाले यांनी, शेतकऱ्यांनी फक्त भात शेती करून चालणार नाही, तर आपल्या शेतीला औद्योगिक शेती कशी करता येईल, शेतीशी निगडित व्यवसाय कसे करता येईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच भात पिकासोबत इतर पिके घ्यावी, असे सांगितले. विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अजून जोमाने कार्य करावे, असेही यावेळी सूचित केले. नष्टे यांनी,  शेतकऱ्यांना भात पिकासोबत फळ व भाजीपाला पिकांचा समावेश करून आर्थिक स्थिती कशी उंचावता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. 

कृषी कर्मचारी व शेतकऱ्यांचा सत्कार - कार्यक्रमात २०२०-२१ रब्बी हंगाम पीक स्पर्धेत तालुक्यातील  सर्वात जास्त उत्पादन घेणारे शेतकरी लक्ष्मी टिकेश्वर बांते (सेलोटपार),  कुसूम शिवाजी बांते (सेलोटपार), विश्वनाथ कांशिराम बांते (खैरी) यांचा तसेच नागपूर विभागातून सर्वाधिक ४६.९० हेक्टर क्षेत्रात  फळबाग लागवड केल्याबद्दल सरांडी येथील कृषी सहायक विशाल साटकर यांचा आमदार रहांगडाले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी सहायक रूपेश रिनाईत व नरेश रहांगडाले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

 

टॅग्स :agricultureशेती