शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुण्यावरुन आलेल्यांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातून एकूण ८५७ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात १ स्वॅब नमुना कोरोना बाधीत आढळला असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा आता ४९ वर पोहचला आहे. यात ४८ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण तर एक रुग्ण आधीच कोरोना मुक्त झाला आहे.

ठळक मुद्देमंगळवारी पुन्हा एका रुग्णाची भर : आकडा पोहचला ४८

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणारे स्थलांतरित मजूर आणि नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा ग्राफ दररोज वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा एका कोरोना बाधीत रुग्णाची वाढ झाली.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा आता ४८ वर पोहचला आहे. तर मुंबई, पुण्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्हावासीयांची चिंता वाढविली आहे.शासनाने स्थलांतरित मजूर आणि विविध जिल्हा व राज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली. त्यानंतर जिल्हात मुंबई, पुणे या रेड झोन क्षेत्रातून आलेल्या मजुरांमुळे कोरोना मुक्त असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विशेष म्हणजे तब्बल एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल २७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.२५) जिल्ह्यात चार कोरोना बाधीत रुग्ण आढळले होते, त्यानंतर मंगळवारी पुन्हा एक कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ४८ वर पोहचला आहे. हे सर्व कोरोना बाधीत रुग्ण ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचे हाटस्पॉट तयार होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन सुध्दा गोंधळल्याचे चित्र आहे. कोरोना बाधीत रुग्णांचा ग्राफ वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढल्याचे चित्र आहे.१७९ नमुुन्यांचा अहवाल अप्राप्तकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातून एकूण ८५७ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात १ स्वॅब नमुना कोरोना बाधीत आढळला असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा आता ४९ वर पोहचला आहे. यात ४८ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण तर एक रुग्ण आधीच कोरोना मुक्त झाला आहे. तर १७९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप नागपूर येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात एकूण १३ कंटेनमेंट झोनसात तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ कंटेनमेंट झोन घोषीत केले आहेत. त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरुणनगर, करांडली, बराडटोली, सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार, सलईटोला, गोंदिया तालुक्यातील कटंगी, परसवाडा, नवरगाव कला, गोरेगाव तालुक्यातील गणखैरा, आंबेटोला, तिरोडा तालुक्यातील तिरोडा नगर आणि सालेकसा तालुक्यातील धनसुवा या क्षेत्राचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या