गोंदिया शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:03 PM2020-09-14T22:03:03+5:302020-09-14T22:05:06+5:30

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. झपाटयाने वाढत असलेली रूग्ण संख्या आजघडीला ३००० पार झाली आहे.

Composite response to public curfew in Gondia city | गोंदिया शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

गोंदिया शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

Next
ठळक मुद्देबाजारपेठेत बंदचा प्रभावकाही व्यापाऱ्यांचे समर्थन नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव बघता येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यूला रविवारपासून (दि.१३) सुरूवात केली आहे. यात रविवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत जनता कर्फ्यूला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. मात्र सोमवारी (दि.१४) काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी उघडून आम्ही सोबत नसल्याचे दाखवून दिले. तरिही बाजारपेठेत संमिश्र जनता कर्फ्यू दिसून आला.
जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले आहे. झपाटयाने वाढत असलेली रूग्ण संख्या आजघडीला ३००० पार झाली आहे. तर दररोज मृतांची संख्याही वाढत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रूग्ण संख्या वाढ होत असून एकूण रूग्णांच्या ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले आहेत. एकंदर शहराची स्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. अशात वेळीच यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे. यासाठी बाजारपेठ मध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणणे गरजेचे असून यासाठीच बाजारपेठेतील काही व्यापाºयांनी पुढाकार अन्य घेत अन्य व्यापाºयांचे समर्थन घेऊन रविवारपासून (दि.१३) जनता कर्फ्यू केला आहे.

रविवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत या जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद मिळाला व कडकडीत बंद दिसून आला. मात्र सोमवारी (दि.१४) बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी उघडून जनता कर्फ्यूला समर्थन नसल्याचे दाखवून दिले. परिणामी सोमवारी बाजारपेठेतही जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळून आल्याचे दिसले. यात दुकान उघडणाऱ्यांचे अत्यंत कमी होते व त्यामुळे चांगलाच बंद दिसून आला. कोरोनाचा वाढता प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी व्यापारी एकमेकांना सोबत घेऊन आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी बंदचे आवाहन करीत आहेत, हे विशेष.

शहरातील अन्य भागात प्रतिसाद नाहीच
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या जनता कर्फ्यूला कित्येक व्यापारी संघटनांनी आपले समर्थन दिले आहे. त्यानुसार, बाजारपेठेत कडकडीत बंद ही दिसून येत आहे. मात्र शहरातील अन्य भागांमध्ये नजर टाकल्यास व्यापारी जनता कर्फ्यूच्या समर्थनात नसल्याचे दिसत आहे. शहरातील अन्य भागात नेहमीप्रमाणेच दुकानी सुरू असल्याचे दिसले. यावरून हा जनता कर्फ्यू फक्त बाजारपेठ पुरताच मर्यादीत असल्या सारखे वाटले.

बाजारात गर्दी घटली
बाजारपेठ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असून कोरोनाला आपले पसरण्यासाठी हेच वातावरण पोषण ठरते. त्याचा फटकाही जिल्हा व शहरवासी चांगलाच झेलत आहेत. गर्दी नियंत्रणात आल्यास कोरोनाची साखळी तुटून नक्कीच रूग्ण संख्या घटणार असा विश्वास बाजारातील व्यापाऱ्यांना आहे. त्यांच्या या जनता कर्फ्यूच्या २ दिवसांत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे दिसले. यामुळे त्यांच्या बंदचे नक्कीच चांगले परिणाम येतील असे म्हणता येईल.

 

 

Web Title: Composite response to public curfew in Gondia city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.