शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संचारबंदी कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

देशासह राज्यात कोरोनाने शिरकाव केला असून दिवसागणीक रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची संख्या बघता शासनाची धावपळ वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे टाळणे गरजेचे झाले आहे. हीच बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी संबोधित करत रविवारी (दि.२२) देशात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते.

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणात दुकाने बंद : थोड्याफार प्रमाणात वर्दळ दिसली, आता नागरिकांच्या सहकार्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला देशवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतरही राज्यातील कित्येक जिल्ह्यांत सुरक्षेच्या दृष्टीने लॉकडाऊन करण्यात आले. याची दखल घेत जिल्ह्यातही नागरिकांनी घराबाहेर निघण्याचे टाळले. तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी बंद ठेवल्याचे दिसले. परिणामी सोमवारीही (दि.२३) जिल्ह्यात संचारबंदी कायम दिसली.देशासह राज्यात कोरोनाने शिरकाव केला असून दिवसागणीक रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची संख्या बघता शासनाची धावपळ वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे टाळणे गरजेचे झाले आहे. हीच बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी संबोधित करत रविवारी (दि.२२) देशात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. खुद्द पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनावरून प्रसंगाचे गांभीर्य बघत देशवासीयांना रविवारी (दि.२२) कडकडीत बंद पाळून ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद दिला.रविवारच्या या ‘जनता कर्फ्यू’ नंतरही रूग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेत शासनाने देशातील कित्येक राज्यांत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यानुसार, महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे सर्व आपल्या आरोग्यासाठी केले जात असल्याचे बघत जिल्हावासीयांनीही स्वेच्छेने प्रतिसाद देत सोमवारी (दि.२३) ‘जनता कर्फ्यू’ पाळला. यांतर्गत नागरिकांनी सकाळपासूनच घराबाहेर निघणे टाळत घरीच राहण्यास पसंती दर्शविली. शिवाय व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून या आपत्तीत आपला सहभाग नोंदविला. सोमवारी (दि.२३) जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हेच चित्र दिसून आले. तर तुरळक प्रमाणात नागरिक घराबाहेर दिसून आले.जिल्ह्यातील ६२८ जण निगरानीखालीकोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर कोरोनामुळे विदेशात वास्तव्यास असणारे अनेकजण स्वगृही परतत आहे. सोमवारपर्यंत (दि.२३) विदेशातून एकूण १२१ जण जिल्ह्यात परतले आहेत. यासर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ५०८ अशा ६२८ जणांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. हे सर्वजण प्रशासनाच्या निगरानीखाली आहेत.बाहेरील देशातून कामानिमीत्त देशात येणाºयांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर जिल्हास्तरावर सुद्धा कोरोनाचा दररोज आढावा घेतला जात आहे. विदेशातून जिल्ह्यात परतणाºया नागरिकांची नोंदणी केली जात आहे. त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.विदेशात असलेले १२१ जण आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची ५ जणांना लक्षणे दिसली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या ५ जणांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकही संशयीत किंवा बाधीत रूग्ण नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या