शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांची उप जिल्हा रूग्णालयाला ‘सरप्राईज व्हिजीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोरोना विषाणूने बाधित व्यक्ती तिरोडा तालुक्यात जास्त असून यातील बहुतांश व्यक्ती आखाती देशात रोजगारानिमित्त गेल्या होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील उद्योगधंदे बंद असल्याने ते परत जिल्ह्यात आले आहे. यामुळे तिरोडा तालुक्यातील विविध आजार असलेल्या रूग्णांवर चांगले उपचार या रूग्णालयात झाले पाहिजे आणि त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी ही भेट दिली.

ठळक मुद्देरूग्णालयाची तपासणी व रेकॉर्डची पाहणी : आरोग्य यंत्रणेचा अहवाल सादर करण्याचे निर्देशन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कशाप्रकारे दक्ष राहून काम करीत आहे हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयाला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली. याप्रसंगी त्यांनी रूग्णालयाची स्वत: बारकाईने पाहणी करून रेकॉर्डही तपासले व कामकाज तसेच व्यवस्थेचा आढावा घेतला.विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोरोना विषाणूने बाधित व्यक्ती तिरोडा तालुक्यात जास्त असून यातील बहुतांश व्यक्ती आखाती देशात रोजगारानिमित्त गेल्या होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील उद्योगधंदे बंद असल्याने ते परत जिल्ह्यात आले आहे. यामुळे तिरोडा तालुक्यातील विविध आजार असलेल्या रूग्णांवर चांगले उपचार या रूग्णालयात झाले पाहिजे आणि त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी ही भेट दिली.याप्रसंगी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत असलेले उपचार तसेच रु ग्णालयात उपलब्ध सोयी-सुविधांची माहिती घेतली. तसेचे तेथे अधिकाऱ्यांकडून फिव्हर क्लिनिकमध्ये येत असलेल्या रूग्णांची देखील माहिती जाणून घेतली.फिव्हर क्लिनीकमध्ये येणाºया नागरिकांना ताप, सर्दी, खोकला किंवा इतर प्रकारच्या आजाराची लक्षणे असल्यास त्यांचे उपचार व देखरेखीची प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते याबाबतही माहिती त्यांनी जाणून घेतली. आढावा घेताना त्यांनी स्वत: रूग्णालयात प्रत्येक ठिकाणी जाऊन निरीक्षण करून रेकॉर्डची तपासणी केली. रूग्णालयाच्या ठिकाणी काही कामात अनियमितता आढळल्यावर संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावीत केली. तसेच या बाबतचा अहवाल बोलवून जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना संबंधित यंत्रणेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी व त्यांच्या पथकाला कंटेन्मेंंंट झोनमधून येणाºया नागरिकांची विशेष निगराणी व देखरेख करण्याचे निर्देश दिले. आरोग्य विषयक यंत्रणेला आणखी सक्षम करण्यासाठी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी एकत्र येऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन त्या बाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपदे, तहसीलदार प्रशांत घोरूडे, तालुका आरोग्य अधिकारी अभय पाटील व इतर कार्यरत अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.रूग्णांच्या घरी जाऊन साधला संवादफिव्हर क्लिनीकमध्ये येणाऱ्या एकूण प्रकरणांपैकी रेकॉर्ड तपासल्यावर ताप व यु.आर.आई चे लक्षण असलेल्या तालुक्यातील ग्राम चिरेखनी येथील देबीलाल पारधी, कविता राऊत, भाग्यश्री कोटांगले या ३ रूग्णांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन डॉ.बलकवडे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी तिघांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली व त्यांना कुठल्याही आजारांची लक्षणे नसल्याची खात्री केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी