शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांची क्वारंटाईन सेंटरला आकस्मिक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा दक्षतेने काम करीत आहे काय हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे या सर्व तालुक्यात आकस्मिक भेट देऊन आरोग्य व इतर यंत्रणेविषयक कामकाज तथा व्यवस्थेची पाहणी करीत आहे. यातच तिरोडा तालुक्याला बुधवारी (दि.१) त्यांनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.

ठळक मुद्देकोरोना उपाययोजनांचा घेतला आढावा : रेल्वे स्थानकाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. क्वारंटाईनमध्ये सोयी सुविधांबाबत अनेकांच्या तक्रारी आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी तालुक्यातील क्वारंटाईन सेंटरला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिल्याने तालुका यंत्रणेची तारांबळ उडाली होती.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा दक्षतेने काम करीत आहे काय हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे या सर्व तालुक्यात आकस्मिक भेट देऊन आरोग्य व इतर यंत्रणेविषयक कामकाज तथा व्यवस्थेची पाहणी करीत आहे. यातच तिरोडा तालुक्याला बुधवारी (दि.१) त्यांनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्ती तिरोडा तालुक्यात जास्त आढळले असून यातील बहुतांश व्यक्ती आखाती देशात रोजगारानिमित्त गेले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील उद्योगधंदे बंद असल्यामुळे ते मुंबई किंवा अहमदाबाद येथे विमानाने आणि तेथून रेल्वे मार्गाने जिल्ह्यात येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन तिरोडा रेल्वे स्टेशनला डॉ. बलकवडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य विभागामार्फत स्टेशनवर करण्यात येणाऱ्या तपासणी प्रक्रि येची पाहणी केली. तालुक्यातील बाहेरून आलेल्या व्यक्ती तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये आजाराची काही लक्षणे असलेल्या रुग्णांवर चांगले उपचार झाले पाहिजे तसेच तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे या पार्श्वभूमीवर त्यांनी आढावा देखील घेतला.यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, तिरोडा उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, तिरोडा तहसीलदार प्रशांत घोरुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कांचन राहांगडाले, डॉ.पारधी व अधिकारी उपस्थित होते. शासकीय विलगीकरण केंद्र व गृह विलगीकरणात तसेच कोरोना कोविड सेंटरमध्ये असलेल्या नागरिक व रूग्णांची माहिती जिल्हाधिकाºयांनी यावेळी घेतली. ताप, सर्दी, खोकला किंवा आजाराची इतर लक्षणे आदिबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच आरोग्य व सर्व्हेक्षण करताना नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले.याप्रसंगी तिरोडा रेल्वे स्टेशनवर रेल्वेने परत आलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची विशेष काळजी घेऊन सुरक्षित फिजिकल डिस्टन्स तसेच रेल्वे स्थानकाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश स्टेशन मास्तरांना दिले.क्वारंटाईन कक्षातील नागरिकांशी साधला संवादरेल्वे स्टेशननंतर मेंढा गावातील क्वारंटाईन केन्द्र, रविंद्रनाथ टागोर आश्रमशाळेला जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी भेट दिली. प्रत्येक ठिकाणी जाऊन निरीक्षण केले.क्वारंटाईन केंद्रात असलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी बरोबर होत आहे का, तसेच त्यांना वेळेवर दैनंदिनी सोयी सुविधा, जेवण औषधे पुरविली जात आहे का याबाबतची माहिती रु ग्णाकडून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच तेथील नागरिकांशी सुध्दा संवाद साधला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी