शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
5
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
6
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
7
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
8
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
9
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
10
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
11
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
12
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
13
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
14
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
15
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
16
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
17
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
18
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
19
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
20
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...

जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 5:00 AM

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शहरात दीडशेहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. याला वेळीच पायबंद लावला नाही तर शहरातील स्थिती आणखी बिघडू शकते. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याच्या दौºयावर आले असता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना युध्द पातळीवर राबवण्यिाचे निर्देश दिले होते.

ठळक मुद्देकोरोनाची माहिती लपविल्यास १० हजाराचा दंड : ८७ बाधितांना बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा संसर्ग होवून त्याची माहिती नगर परिषद आणि आरोग्य प्रशासनाला न देताच घरी राहणाऱ्या कोरोना बाधितांवर धडक कारवाई करण्यास रविवारी (दि.२७) जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. जिल्हाधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, विभागप्रमुखांच्या नेतृत्त्वातील १६ पथकांनी रविवारी सकाळपासूनच शहरातील विविध भागाला थेट भेट देत माहिती लपविणाऱ्या ८७ कोरोना बाधितांना नोटीस बजाविली. तसेच प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या धडक कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शहरात दीडशेहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. याला वेळीच पायबंद लावला नाही तर शहरातील स्थिती आणखी बिघडू शकते. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याच्या दौºयावर आले असता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना युध्द पातळीवर राबवण्यिाचे निर्देश दिले होते.तसेच शासनातर्फे माझे कुटुंब माझी जवाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. शहरातील कोरोनाची बिघडत चाललेली परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा हे आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह स्वत: मैदानात उतरत रविवारपासून धडक कारवाईची मोहीम सुरू केली. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील श्रीनगर, कुंभारेनगर परिसराला भेट देत कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर याची माहिती नगर परिषद आणि आरोग्य विभागाला न देता होम क्वारंटाईन असणाऱ्या कोरोना बाधितांच्या घरी भेट देत त्यांना १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली. होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर दंडाची रक्कम न भरल्यास फौजदारी कारवाईस तयार राहण्याचा इशारा दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक मोहीमेमुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. शहरावासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुरू केलेल्या मोहीमेचे स्वागत केले.शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जवाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. याच पार्श्वभुमीवर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी माझा जिल्हा माझी जवाबदारी या धर्तीवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सातत्याने राबविण्यात येईल.- दीपककुमार मीणा, जिल्हाधिकारी गोंदिया.........................................................................शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोनाची माहिती लपविणाºया रुग्णांमुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. याला वेळीच पायबंद लावून परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा यांच्या नेतृत्त्वात धडक मोहीम सुरू केली आहे. यातंर्गत माहिती लपविणाऱ्या कोरोना बाधितांच्या घरी भेट देऊन त्यांना १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली जात आहे.- वंदना सवरंगपते, उपविभागीय अधिकारी.एकाच दिवशी एकाच वेळी १६ पथकांची कारवाईकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पार्श्वभुमीवर रविवारी जिल्हा प्रशासन मैदानात उतरत अप्पर जिल्हाधिकाºयांपासून ते नगर परिषद मुख्याधिकाºयांचा समावेश असलेल्या अधिकाºयांचे १६ भरारी पथके तयार करुन शहरातील वेगवेगळ्या भागात एकाच वेळी कारवाई करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही याची माहिती नगर परिषद आणि आरोग्य विभागापासून लपवून होम क्वारंटाईन असणाºया ८७ बांधितांच्या घरी धडक देत १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली. तसेच दंड न भरल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला.१२०० कोरोना बाधितांनी दडवली माहितीजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागील कारण बाधित आल्यानंतर त्याची माहिती लपविणे हे देखीेल आहे. शहरातील जवळपास १२०० कोरोना बाधितांची पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि नगर परिषदेला दिली नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या