शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या पोटातून काढला साडेतीन किलोचा गोळा

By admin | Updated: January 24, 2015 01:20 IST

घरची परिस्थिीती हलाकीची असल्याने उपचारासाठी पैसे नसताना खासगी डॉक्टर उपचारासाठी नागपूरला जाण्याचा सल्ला देत असल्याने गोंधळात पडलेल्या महिलेला नातेवाईकांनी गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल केले.

गोंदिया : घरची परिस्थिीती हलाकीची असल्याने उपचारासाठी पैसे नसताना खासगी डॉक्टर उपचारासाठी नागपूरला जाण्याचा सल्ला देत असल्याने गोंधळात पडलेल्या महिलेला नातेवाईकांनी गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल केले. त्या महिलेवर तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून साडेतीन किलो वजनाचा गोळा काढण्यात आला.गोंदियाच्या टीबीटोली येथील रजनी दिलीप चौकसे (४८) असे त्या महिलेचे नाव आहे. मागील सहा महिन्यांंपासून तिच्या पोटात दुखणे, शौचास साफ न होणे व रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्या महिलेने येथील डॉ.मनिषा गुप्ता यांच्याकडे उपचार केला. त्यांनी तपासणी केल्यावर रजनीला नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. पैशाची चणचण असल्याने नागपूरला जाणे शक्य नाही. त्यामुळे रजनीला नातेवाईकांना बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल करण्यात आले. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत त्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गंगाबाई स्त्री रूग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सायास केंद्रे, डॉ. पूनम पारधी, बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. ललीत कटरे यांनी दोन तास शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून साडे तिन किलो वजनाचा गोळा काढला. यासाठी त्यांना दोन बॉल रक्त लावण्यात आले. गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या रक्त पेढीतून ते रक्त पुरविण्यात आले. या गोळ्यामुळे त्यांना अपचन होत होते. पाळीत मोठ्या प्रमाणात रक्त जाणे हा त्रास होता. नंतर या गोळ्यातून कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तो गोळा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी ४० हजार रूपये खासगी डाक्टरांकडे लागणार होते. परंतु राजीव गांधी योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. आमगाव येथील ओमीता मेश्राम (५०) या महिलेच्या पोटातून डॉ. योगेश सोनारे यांनी एक किलो वजनाचा असाच गोळा काढला आहे. (तालुका प्रतिनिधी)