शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोकणा झाले स्मार्ट ग्राम

By admin | Updated: May 2, 2017 00:30 IST

लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यात यशस्वी राहीलेले गोंदिया जिल्ह्यात सडक-अर्जुनी तालुक्याच्या कोकणा हे गाव स्मार्ट ग्राम म्हणून पुढे आले आहे.

गोंदिया : लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यात यशस्वी राहीलेले गोंदिया जिल्ह्यात सडक-अर्जुनी तालुक्याच्या कोकणा हे गाव स्मार्ट ग्राम म्हणून पुढे आले आहे. गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी पर्यावरण, जतन व संरक्षण करून समृध्द व संपन्न गावाची निर्मिती करण्याचा दृष्टीने राज्यात २०१०-११ या वर्षात पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजना अमंलात आणली. परंतु या योजनेत नोव्हेंबर २०१६ मध्ये स्मार्ट ग्राम नावाने चालविण्यात येत आहे. लोकसहभागातून पर्यावरणाचा समतोल राखणे, समृध्द ग्राम निर्माण करणे, राज्य शासनाच्या विविध विभागाशी ग्रामस्तरीय योजनांची सांगड घालणे, समन्वय साधणे, नव्या उपक्रमाची अमंलबजावणी करणे या सर्व निकषात सडक-अर्जुनी तालुक्याचा कोकणा हे गाव सर्वाधिक गुण घेऊन स्मार्ट ग्राम म्हणून जिल्ह्यात आपले नाव लौकिक केले आहे. स्वमुल्यांकन करून २५ टक्के ग्राम पंचायती तालुकास्तरावर स्मार्ट ग्रामच्या स्पर्धेत उतरल्या. स्पर्धेतील निकष लक्षात घेऊन तालुका स्पर्धेत असलेल्या गावांचे मूल्यांकन करण्यात आले. यात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक येणाऱ्या गावाला प्रत्येकी १० लाखाचे बक्षीस देण्यात आले. तालुकास्तरावर प्रथम आलेल्या गावांना जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम च्या स्पर्धेत ठेवण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील कारंजा, तिरोडा तालुक्यातील बोदा, आमगाव तालुक्यातील रामाटोला, सालेकसा तालुक्यातील गांधीटोला, देवरी तालुक्यातील जेठभावडा, गोरेगाव तालुक्यातील पाथरी, सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दाभना ही गावे स्पर्धेत होती. १० ते १३ एप्रिल दरम्यान झालेल्या मुल्यांकणात कोकणा स्मार्ट ग्राम उद्यास आले. (तालुका प्रतिनिधी)५० लाखातून होणार कायापालट जिल्हास्तरीय स्मार्ट ग्रामच्या स्पर्धेत असलेल्या कारंजाला ५८.५, बोदा ५६.५, रामाटोला ७५, गांधीटोला ५९, जेठभावडा ७५, पाथरी ७०, कोकणा ७८ व दाभणा ६२ गुण मिळाले. तालुकास्तरावरचा १० लाखाचा पुरस्कार व जिल्हास्तरावरचा ४० लाखाचा पुरस्कार असे ५० लाख रुपये पुरस्कारापोटी कोकणा या गावाला मिळाले असून पुरस्काराच्या रकमेतून कोकणा या गावाचा कायापालट होणार आहे.