शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
4
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
5
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
6
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
7
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
8
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
9
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
10
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
11
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
12
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
13
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
14
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
15
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
16
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
17
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
18
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
19
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
20
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस धान खरेदी बंद

By admin | Updated: December 7, 2014 22:53 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीच्या अरेरावीविरुद्ध व्यापाऱ्यांनी रणशिंग फुंकले असून पोलिसांत केलेल्या खोट्या तक्रारींच्या निषेधार्थ ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद पाळण्याचा निर्णय घेतला.

व्यापाऱ्यांचा निर्णय : १० डिसेंबरला व्यापारी संघटनेतर्फे साखळी उपोषण
अर्जुनी/मोरगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीच्या अरेरावीविरुद्ध व्यापाऱ्यांनी रणशिंग फुंकले असून पोलिसांत केलेल्या खोट्या तक्रारींच्या निषेधार्थ ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद पाळण्याचा निर्णय घेतला. तर १० डिसेंबर रोजी तालुका व्यापारी संघटनेतर्फे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
४ डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशिम जमा कुरेशी व धान व्यापारी संघटनेत जुंपली होती. यावर सभापतींनी ५ डिसेंबर रोजी तीन धान व्यापाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गुरुवारी कृ.उ.बा.स. च्या संचालक मंडळाची सभा होती. काही व्यापारी आपल्या समस्या घेऊन तेथे पोहोचल असता सभा आटोपली असे त्यांना सांगण्यात आले. व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी व संचालक सत्यनारायण चांडक यांच्या परवानगीने व्यापारी सभागृहात पोहोचले. व्यापाऱ्यांनी सभापतींना समस्या सांगितल्या. त्या त्यांनी ऐकून घेतल्या नाहीत. यावर्षी धानाचे एक हजार ५०० रुपये प्रति क्विंटल सेस फी वसूल करण्यात येईल व तांदळाचे भाव दोन हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे संचालक मंडळ व कोणालाही विश्वासात न घेता स्वमर्जीने सभापतींनी ठरविले. यासंदर्भात त्यांना विचारणा केली तर ते उद्धट शब्दात बोलतात व स्वत:च सभागृहांच्या बाहेर जाण्यास बाध्य करतात. उलट पोलीस ठाण्यात त्यांनी व्यापाऱ्यांविरूध्द खोटी तक्रार केली.
बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांना कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण झालेले नाही. ते नसतांनाही व्यापाऱ्यांकडून अवैधरित्या बाजार फी वसूल केली जाते. वडसा, लाखनी, लाखांदूर, ब्रम्हपुरी या ठिकाणच्या बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने शेतमालावर ७० टक्के कर्ज दिले जाते. हा लाभ येथील शेतकऱ्यांना मिळत नाही व ते व्यापाऱ्यांना गोदाम भाड्याने दिले जाते. आधारभूत धानाचे शासकीय दर केंद्रशासन ठरवितो. एक हजार ३६० रुपये प्रति क्विंटल दर ठरविले असतांनाही संचालकांना कुठलीही पूर्वसूचना न देता एक हजार ५०० रुपये प्रति क्विंटल व्यापाऱ्यांकडून बाजार फी वसूल करण्याचा निर्णय सभापती कुरैशी व सचिव काळबांधे यांनी घेतला असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
या सर्व अन्यायाविरूध्द व्यापाऱ्यांनी ८ ते १० डिसेंबरपर्यंत धान व्यापार बंद ठेवण्याचा एका सभेत निर्णय घेतला आहे. सभापतींच्या कृतीचा राईस मिलर्स, व्यापारी अडते, हमाल संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
(तालुका प्रतिनिधी)