शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

दारूचे दुकान बंद करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:22 IST

येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात  यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर  मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन  ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या  आहेत.

ठळक मुद्देमाटरगाव येथील ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांचा पाठिंबा; ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कमाटरगाव  : येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात  यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर  मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन  ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या  आहेत.माटरगाव येथे शासनमान्य देशी दारूचे दुकान असून, सदर  दुकानाच्या २00 फूट अंतरावरच जि.प.ची उर्दू शाळा आहे.  त्यामुळे शाळेमध्ये शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांवर याचा विपरी त परिणाम होत आहे. तसेच बाजूलाच मरी मातेचे मंदिर असून, ते थे दररोज सकाळ व संध्याकाळी भाविक भक्त दर्शनासाठी जातात.  त्यामुळे भाविक भक्तांना दारुड्यांचा त्रास सहन करावा लागतो.   देशी दारूच्या दुकानासमोर धर्मशाळा असून, सदर धर्मशाळेतसुद्धा  नेहमीच धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ इत्यादी कार्यक्रम होत  असतात. त्यामुळे महिलांनासुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो.   सदर दारू दुकानासमोर लोक नेहमी दारू पिऊन धिंगाणासुद्धा  घालतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या लोकांनासुद्धा  त्रास होतो. तसेच दारूच्या या सवयीमुळे गावातील अनेकांचे संसार  उद्ध्वस्त झाले आहेत.  गावामध्ये दारूमुळे नेहमी वाद होऊन  बिकट परिस्थितीही निर्माण होत आहे. त्यामुळे येथील सरकारमान्य  देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामसभेत  ग्रामस्थांनी केली आहे. सदर मागणी महिला व पुरुषांच्यावतीने  करण्यात आली. त्याला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सकारा त्मक प्रतिसाद दिला व गावातून दारू ही कायमची हद्दपार व्हावी व  गावातील सर्व जनता ही सुखी समाधानाने नांदावी म्हणून याबाब तचा ठराव हा एकमताने मंजूर झाला आहे. सदर ठरावावर सूचक  राजेंद्र आळशी असून, अनुमोदन प्रकाश तायडे यांनी केले.सदर ठरावाच्या प्रती गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील, पालकमंत्री  ना.भाऊसाहेब फुंडकर, आमदार अँड. आकाश फुंडकर, मुंबई  पोलीस महासंचालक सतीश माथूर, जिल्हाधिकारी बुलडाणा,  विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, जिल्हा पोलीस अधीक्षक  बुलडाणा, ठाणेदार जलंब आदींनासुद्धा पाठविलेल्या आहेत. 

युवकांमध्ये वाढत आहे व्यसनाधीनतेचे प्रमाणगावात दारूचे दुकान असल्यामुळे युवकांमध्येसुद्धा व्यसनाधीनतेचे  प्रमाण वाढत चालले असून, देशाचे भवितव्य समजली जाणारी  युवा पिढी व्यसनापायी बरबाद होत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण  झालेले आहे. सदर बाबीचा त्रास माता-भगिनींना मोठय़ा प्रमाणात  सहन करावा लागतो. त्यामुळे गावात दारू उपलब्ध होऊच नये,  अशी अपेक्षा सुज्ञ पालकवर्गाकडून व्यक्त केली जात असून,  त्यांच्याकडून दारूबंदीसाठी आग्रह धरला जात आहे.