शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

कचारगडला ‘ब’ वर्ग धार्मिक पर्यटनाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:11 IST

तमाम आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र पारीकोपार लिंगो माँ कंकाली देवस्थान कचारगड

तमाम आदिवासींचे श्रद्धास्थान : संजय पुराम यांच्या प्रयत्नांना यश सालेकसा : तमाम आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र पारीकोपार लिंगो माँ कंकाली देवस्थान कचारगड (धनेगाव)ला ‘ब’ वर्ग धार्मिक पर्यटनाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती आ.संजय पुराम यांनी दिली. जिल्ह्यात एका यात्रेत सर्वाधिक लोक भेट देत असलेल्या कचारगडला ब दर्जा मिळाल्यामुळे येथे विकास कामे करण्याचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे. विशेष म्हणजे ब वर्गाचे धार्मिक पर्यटनस्थळाचा दर्जा मिळविणारे कचारगड हे गोदिया जिल्ह्यातील एकमेव स्थळ ठरले आहे. समस्त आदिवासी समाजासाठी श्रद्धास्थान असणाऱ्या कचारगडची महती सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणली. त्यामुळे विदर्भातून आणि महाराष्ट्रातूनच नाही तर विविध राज्यातील आदिवासी समाजबांधवांची येथे माघ पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त दरवर्षी गर्दी वाढतच आहे. यावर्षी येथे येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या ७ लाखांवर गेल्याची माहिती आहे. नैसर्गिकरित्या तयार झालेली आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा असल्यामुळे कचारगडबद्दल आदिवासी समाजासोबत इतरांनाही कुतूहल असते. त्यामुळे हे ठिकाण ब वर्ग धार्मिक पर्यटनस्थळ व्हावे यासाठी आमदार संजय पुराम यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या विनंती पत्रानुसार महाराष्ट्र शासनाने २३ जानेवारी २०१७ नुसार ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी कचारगड देवस्थान ‘क’ वर्गात येत होते. सामाजिक जबाबदारी लक्षात घेता कचारगडच्या विकासाकरिता आपण सदैव प्रयत्नरत राहणार असून रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शुद्ध पाणी यात्रेकरुंना मिळावे म्हणून पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार असल्याचे आ.पुराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भोजनगृहाचे काम सुरू असून यात्रेकरुंना थांबण्याकरिता सभागृहासाठी ५ कोटी रुपये निधी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. पालकमंत्र्यांनीही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी करावयाच्या कामांची अंदाजपत्रके सादर करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना पत्र देण्यात आले आहे. ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे कचारगड देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, सचिव संतोष पंधरे, बारेलाल वरकडे, सरपंच पूरा वरकडे, शंकर मडावी, मनोज इळपाते, विरेंद्र उईके, मनिष पुसाम, मुकेश इनवाते, रामदास मडावी, चुन्नीलाल मरस्कोले, टेकाम, जि.प. सदस्य विजय टेकाम व इतर आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.