शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक न्यायमंचाने ग्राह्य धरला शेतकरी अपघात विमा दावा

By admin | Updated: December 24, 2014 23:02 IST

शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूबद्दल त्यांच्या पत्नीने न्यू इंडिया विमा कंपनीकडे केलेला दावा वर्ष लोटूनही मंजूर-नामंजूर सदर कंपनीने कळविले नव्हते. त्यामुळे तिने ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

गोंदिया : शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूबद्दल त्यांच्या पत्नीने न्यू इंडिया विमा कंपनीकडे केलेला दावा वर्ष लोटूनही मंजूर-नामंजूर सदर कंपनीने कळविले नव्हते. त्यामुळे तिने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात न्यायमंचाने विमा दाव्याचे एक लाख रूपये नुकसान भरपाईसह मृत शेतकऱ्याच्या पत्नीला द्यावे, असा आदेश न्यू इंडिया विमा कंपनीला दिला आहे.
जीरा टीकाराम उके रा. नवेगाव (खु), ता. तिरोडा, जि. गोंदिया असे तक्रारकर्त्या शेतकरी पत्नीचे नाव आहे. तिचे पती टीकाराम सिताराम उके यांना १९ डिसेंबर २०१२ रोजी एका अज्ञात वाहनाने नवेगाव फाट्याजवळ धडक दिली होती. त्यात ते जागीच गतप्राण झाले. त्यांच्या नावे नवेगाव खु. येथे सर्व्हे-४१९ या वर्णनाची शेती असून त्यांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढला होता. त्यामुळे जीरा उके यांनी ६ एप्रिल २०१३ रोजी विमा दावा मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांसह रितसर अर्ज केला होता.
मात्र सदर विमा कंपनीने एक वर्षापासून कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे तिला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास झाले. वर्षभरापासून मंजूर-नामंजूर कोणताही निर्णय न घेतल्याने विमा कंपनीच्या सेवेतील त्रुटीबाबत, विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळण्याबाबत ग्राहक न्यायमंचात ७ जून २०१४ रोजी तक्रार दाखल केली. यानंतर न्यायमंचाने विमा कंपनीला नोटीस पाठविले. त्यांचे लेखी जबाब त्यांचे वकील अ‍ॅड. इंदिरा बघेले यांनी ८ सप्टेंबर २०१४ रोजी नोंदविले. त्यात माहितीचा अभाव व तक्रारकर्तीचे पती शेतकरी नसून विमा दाव्यास पात्र नाहीत, तसेच पत्रान्वये मागितलेली माहिती मुदतीत न पुरविल्याने दावा प्रलंबित असल्याचे नमूद केले.
तक्रारकर्ती जीरा उके यांनी शेतकरी अपघात विम्याचा शासन निर्णय, सातबाराचा उतारा, फेरफार नोंदणी, वारसा प्रकरणाची नोंद नमूणा, घटनास्थळ पंचनामा, उत्तरीय तपासणी अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, मरणान्वेषण प्रतिवृत्त, तिरोडा पोलीस निरीक्षकांचे मृत्यूच्या कारणाचे अहवाल आदी सर्व कागदपत्रे सादर केली होती.
शिवाय जीरा उके यांचे वकील अ‍ॅड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, सदर शेतकऱ्याचा मृत्यू १९ डिसेंबर २०१३ रोजी नवेगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला होता. ते शेतकरी होते व कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. त्यांच्या पत्नीने सातबाराचा उतारा व फेरफार नकल जोडली असून त्या विम्याचा लाभ घेण्यास पात्र आहेत. शिवाय सदर विमा कंपनीने वर्ष लोटूनही दावा मंजूर किंवा नामंजूर असे न कळविल्याने सदर दावा मुदतीत आहे. तसेच न कळविणे ही सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे वारसदार म्हणून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा त्यांनी युक्तिवाद केला.
यावर ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने कारणमिमांसा केली व मृत शेतकऱ्याची पत्नी तक्रारकर्ती जीरा उके यांची तक्रार अंशत: मान्य केली. त्यानुसार त्यांना मृतक पतीच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये शेतकऱ्याच्या मृत्यू दिनांकापासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने द्यावे; तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून जीरा उके यांना १० हजार रूपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रूपये आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश न्यायमंचाने न्यू इंडिया विमा कंपनीला दिला. (प्रतिनिधी)