शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:43 IST

शहरात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेने बिकट समस्येचे रूप धारण केले आहे. कित्येक विहिरी व बोअरवेलमधील पाणी दूषित असल्याचे निदर्शनात आले आहे.

बिकट समस्या : सार्वजनिक विहिरी व बोअरवेलमध्ये दूषित पाणीराजीव फुंडे । लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहरात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेने बिकट समस्येचे रूप धारण केले आहे. कित्येक विहिरी व बोअरवेलमधील पाणी दूषित असल्याचे निदर्शनात आले आहे. तालुक्यातील रिसामा गावातील विहिरींजवळ गवताची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. येथील पाण्याचा वापर करणे म्हणजे आजारांनाच आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. तसेच बनगाव ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक ३ मधील विहिरीत अशुध्द पाणी आहे. तेथील पाणी दूषित झाले असून नागरिकांनी पाण्याचा वापर करणे बंद केले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली असून संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विहिरीजवळ सर्वत्र घाण पसरलेली आहे. त्याठिकाणी नाली वाहत असल्याने तेथील दूषित पाणी व्यापारी व ग्राहकांना मिळत आहे. नगरातील सुंदर नगर (बरौगी मोहला) येथील विहीर १५ फुट रुंद असून त्याठिकाणी ८-१० मोटारपंप लागलेले आहेत. शासकीय विहिरीवर खासगी पंप लावण्यात आल्याने परिसरातील लोकांना नेहमीच उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत असते. येथील पाणी दूषित असल्याने ते पिण्यायोग्य नाही. त्याठिकाणी जवळील शौचालयाचे पाणी झिरपत असल्याने पाण्याचा रंग हिरवागार दिसून येतो. येथील पाणी दूषित असल्याने जलजन्य आजारांचा धोका उद्भवण्याची दाट शक्यता आहे.येथील विहिरीजवळील दूषित पाणी व घाण यामुळे विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण करण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या तरी नागरिकांना याच पाण्यावर आपले दिवस काढावे लागत आहे. संबंधित प्रशासनाने दखल घेवून योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.