शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

पेंढाऱ्यांची मुले शिकू अन् टिकूही लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

भीक मागण्यासाठी भटकंती करणारे, आत्मविश्वास गमावून बसलेले, काळानुरूप बदलण्याची मानसिकता नसलेले व परंपरागत व्यवसायाला चिटकून बसलेल्या पेंढारी समाजातील १२ मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कामे गोंदिया तालुक्यातील नवेगाव धापेवाडा येथील शिक्षकांनी केली आहेत. आता ती पेंढाऱ्यांची मुले दररोज शाळेत येऊ लागली आहेत.

ठळक मुद्दे१२ विद्यार्थी करताहेत ज्ञानार्जन: नवेगाव धापेवाडा शाळेतील शिक्षकांचे यशस्वी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पेंढारी जमात ही सुरूवातीपासूनच शिक्षणापासून कोसो दूर आहे. भीक मागण्यासाठी भटकंती करणारे, आत्मविश्वास गमावून बसलेले, काळानुरूप बदलण्याची मानसिकता नसलेले व परंपरागत व्यवसायाला चिटकून बसलेल्या पेंढारी समाजातील १२ मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कामे गोंदिया तालुक्यातील नवेगाव धापेवाडा येथील शिक्षकांनी केली आहेत. आता ती पेंढाऱ्यांची मुले दररोज शाळेत येऊ लागली आहेत.पेंढारी जमातीला प्रगतीचे पंख कधी फुटणार?सद्यस्थितीत त्यांचे भविष्य अंधकारमय राहू नये यासाठी नवेगाव धापेवाडा शाळेतील शिक्षकांचा खटाटोप आहे. या विद्यार्थ्यांचा उत्थान करण्याचा विडा उचलला केंद्रप्रमुख आर.डी.पटले, मुख्याध्यापक सी.पी.चन्ने,बालरक्षक सी.एच.बिसेन यांच्या नेतृत्त्वात आर.सी.चौधरी, गजभिये, ए.टी.सेंदूरकर, एल.आर.राऊत, आर.एच.राऊत, एम.उके यांनी त्यांना दररोज शाळेत येण्याची सवय लागावी यासाठी तशा वातावरणाची निर्मिती केली. ते शाळेत यावे व टिकूनही राहावेत यासाठी शिक्षकांनी सतत गृहभेटी करून त्यांच्या पालकांचे मनपरिवर्तन केले. मागील सत्रात दांडी मारणाऱ्या पेंढाऱ्यांच्या मुलांना आता मुख्यप्रवाहात आणण्यात शिक्षकांना यश आले आहे. त्या विद्यार्थ्यांना आता मराठी वाचता येत नसली तरी बेरीज वजाबाकीत करण्यात ते तरबेज झाले आहेत.मुख्य प्रवाहात आलेली हीच ती पेंढाऱ्यांची मुलेनवेगाव धापेवाडा शाळेत नियमीत येत असलेल्या पेंढाºयांच्या मुलांमध्ये वर्ग पहिली मधील आशिष राजेश पात्रे, आशिष निलकंठ पात्रे, अनुगिरे मनोज पात्रे, पुजा निलकमल पात्रे, दुसऱ्या वर्गात ज्योत मनोज पात्रे, स्तुती लखन बिसेन, सृष्टी कैलाश बिसेन, तिसऱ्या वर्गात आशू मनोज पात्रे, आराधना बंडू पात्रे, चौथ्या वर्गात करूणा राजेश पात्रे, पाचवीत शिवम लखन बिसेन व सातवीत शायद राजेश पात्रे ही मुले शिक्षणासाठी दररोज शाळेत येऊ लागली आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण