शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील सरकार शेतकऱ्यांचे की उद्योगपतींचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST

तिरोडा : खरीप हंगामाला लवकरच सुरूवात होणार असून शेतकऱ्यांसमोर खत व बियाण्यांच्या किंमत वाढीचे संकट निर्माण झाले आहे. केंद्र ...

तिरोडा : खरीप हंगामाला लवकरच सुरूवात होणार असून शेतकऱ्यांसमोर खत व बियाण्यांच्या किंमत वाढीचे संकट निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने खताच्या किमती दुपटीने वाढविल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेती करायची की नाही असा विचार करावा लागत आहे. शेतकरी आधीच संकटात असताना केंद्र सरकारने खताच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करुन शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढविला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकार हे शेतकऱ्यांचे की उद्योगपतींचे असा सवाल माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केला.

यंदा सर्वच खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. धानाची शासकीय आधारभूत किंमत १८६८ रूपये प्रति क्विंटल आहे. तेव्हा केंद्र सरकार शेतकऱ्यांना आवळा देऊन भोपळा घेत आहे. केंद्र सरकार हे उद्योगपतींना मोठे करण्याचे काम करीत असल्याचा आरोप आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार यावर काहीच बोलत नाही. केवळ बिरसी विमानतळावरुन कार्गो सेवा सुरूवात करणार, शेतकऱ्यांचा माल परदेशात किंवा देशाच्या इतर भागात पाठविणार असे सांगून स्वत:चा उदोउदो करुन घेत आहे. मात्र खतांच्या वाढलेल्या किमती, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि यामुळे शेतकऱ्यांची झालेली अवस्था यावर काहीच बोलत नाही. यावरुन त्यांना सुध्दा बळीराजाची चिंता नसल्याचा आरोप माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एका एकरमध्ये उत्पादन खर्च किती येतो याची माहिती पंतप्रधानांना द्या? डिझेल, पेट्रोलची किंमत वाढवून शेतकऱ्यांना शेतीमध्ये ट्रॅक्टर कसे चालवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. एक तास ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करण्यासाठी १ हजार रुपये भाडे द्यावे लागते. शेतात रोवणी करते वेळी मजुरांची मजुरी वाढलेली आहे. तसेच खाद्य तेलाच्या किमती अति गगनाला भिडल्या आहेत.

.....

केवळ आढावा बैठका घेऊन काहीच साध्य होणार नाही

खासदार सुनील मेंढे व खासदार अशोक नेते यांनी खताच्या, बी-बियाण्याच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम दिल्लीत जाऊन कमी करण्याची गरज आहे. इकडे लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्याची व्यथा समजून घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात आढावा बैठका घेऊन काहीच उपयोग नाही. खताच्या वाढलेल्या किमती कमी करणे किंवा शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने सबसिडी देणे, पेट्रोल, डिझेल शेती हंगामाकरिता शेतकऱ्यांना सातबारावर स्वस्त दरावर देणे, खाद्य तेलाच्या किमती तत्काळ कमी कराव्या अशी आमची मागणी आहे.

.........

शेती करायची कशी

इफको खताची जुनी किंमत ११७५ रुपये ५० किलोची बॅग आता वाढविलेली किंमत १७७५ रूपये, १२-३२-१६ खत जुनी ११९० रूपये व नवीन किंमत १८०० रूपये तसेच डीएपी खताची जुनी किंमत १२०० रूपये नवीन किंमत १९०० रूपये एवढी वाढ झाली आहे. यामुळे शेती करणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.