शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

माळी समाजाचे मनोमिलन व सत्कार

By admin | Updated: October 31, 2015 02:43 IST

मानव हा समाजशील प्राणी आहे. मानवाच्या सर्वांगिन प्रगतीसाठी सुंस्कारित समाजाची नितांत गरज आहे.

बोंडगावदेवी : मानव हा समाजशील प्राणी आहे. मानवाच्या सर्वांगिन प्रगतीसाठी सुंस्कारित समाजाची नितांत गरज आहे. समाज एकत्रित येवून सुसंघटीत झाला तरच प्रगतीच्या शिखरावर जाणे शक्य आहे. सामुदायिक उत्सवाच्या माध्यमातून विखुरलेल्या माळी समाजबांधवानी एकत्र यावे. अशा उपक्रमांनी समाज बांधवामध्ये स्नेहाचे नाते घट्ट होऊन विचारांचे आदान-प्रदान होते. समाजातील वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याची किमया समाज संघटनेच्या माध्यमातून सहज केली जावू शकते, असे प्रबोधन पशूचिकित्सक डॉ. डांगोरे यांनी केले. माळी समाज तालुका अर्जुनी-मोरगावच्या वतीने शरद पौर्णिमा उत्सव, माळी समाज मनोमिलन तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अमर मांडगवणे यांच्या वाड्यात बुधवारी आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माळी समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलाश गाडेकर होते. अतिथी म्हणून डॉ. डांगोरे, प्रा. कावळे, तंमुसचे अध्यक्ष तथा संघटनेचे उपाध्यक्ष तुळशीदास बोरकर, आनंद लांजेवार, अर्चना झेलकर, विजय आरेकर, अमर मांडवगणे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. या वेळी समाजबांधवाना मार्गदर्शन करताना मान्यवर म्हणाले, भारताचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू मानले. शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा, असा कानमंत्र त्यांनी दिला. सावित्रीबाईच्या पुण्याईने आज महिलांना समाजात महत्त्वाचे स्थान मिळाले व त्यांनी गरूड झेप घेतली. समाजबांधवांनी शिक्षणप्रेमी बनून प्रगती करण्यासाठी पुढे यावे. आरक्षण बंद होण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशाप्रसंगी माळी समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्यासाठी तत्पर रहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात दहावी व बारावीमध्ये माळी समाजामधून गुणवत्ता प्राप्त करणारे पियुष आदे, आकांक्षा झेलकर, गोमती मंदुरकर, नेहा मांडवगणे, केविल इरले, आयुषी झेलकर, निखिल गायधने या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले. समाजकार्यात महिलांचा सहभाग असावा यासाठी रात्री महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.संचालन गोटाफोडे व आभार पात्रीकर यांनी मानले. स्नेहभोजन व परस्पर भेटीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)