शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता होणार ‘स्मार्ट’

By admin | Updated: January 28, 2015 23:35 IST

नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनेक कष्ट उपसावे लागतात. यात लवचिकता आणण्यासाठी शासनाकडून ‘स्मार्ट कार्ड’ पद्धत आणली जात आहे. या योजनेचे पुणे येथे काम सुरू

अर्जुनी-मोरगाव : नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनेक कष्ट उपसावे लागतात. यात लवचिकता आणण्यासाठी शासनाकडून ‘स्मार्ट कार्ड’ पद्धत आणली जात आहे. या योजनेचे पुणे येथे काम सुरू असून यात लवचिकता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच इतर जिल्ह्यात कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यातून जात वैधता अधिक सुकर होईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. बौध्द समाज तालुका अर्जुनी-मोरगावतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शारदा बडोले, पंचायत समितीचे उपसभापती पोमेश्वर रामटेके, भारतीय बौध्द महासभा तालुका अर्जुनी मोरगावचे अध्यक्ष विजय लाडे, सोनदास गणवीर, सरपंच किरण खोब्रागडे, माजी जि.प.सदस्य रत्नदीप दहिवले, पं.स. सदस्य अल्का बांबोळे, प्रा.कल्पना सांगोळे, प्राचार्य गजेंद्र गजभिये, सुखदेव दहिवले, गोविंदा मेश्राम, डॉ. भारत लाडे उपस्थित होते. यावेळी बडोले यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून प्रा.संजय शहारे यांनी सुसज्ज बौध्दविहार, स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालयाची स्थापना करणे तसेच गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातही दारूबंदी लागू करावी यासह अनेक मागण्या केल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश नंदेश्वर यांनी केले. राजेंद्र लाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौध्द समाज तालुका अर्जुनी-मोरगावचे पदाधिकारी, भारतीय बौध्द महासभा तसेच समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)