शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
4
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
5
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
6
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
7
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
8
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
9
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
10
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
11
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
12
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
14
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
15
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
16
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
17
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
18
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
19
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
20
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

नॉन-क्रिमिलेअरसाठी उमेदवार त्रस्त

By admin | Updated: June 11, 2014 23:19 IST

शैक्षणिक कामासाठी व विविध पदाच्या भरतीसाठी नॉन क्रिमीलिअर व जाती प्रमाणपत्राची गरज असते. परंतु उपविभागीय कार्यालय देवरी मार्फत हे प्रमाणपत्र तीन-तीन महिने लोटूनही देण्यात

स्वत:च करताहेत धडपड : तीन महिन्यात एकही प्रमाणपत्र पाठविले नाही
गोंदिया : शैक्षणिक कामासाठी व विविध पदाच्या भरतीसाठी नॉन क्रिमीलिअर व जाती प्रमाणपत्राची गरज असते. परंतु उपविभागीय कार्यालय देवरी मार्फत हे प्रमाणपत्र तीन-तीन महिने लोटूनही देण्यात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या कार्यालयात पैशाशिवाय काम होत नसल्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
पोलीस भरतीसाठी, इतर शासकीय पदभरतीसाठी तसेच उच्च शिक्षणासाठी नॉन क्रिमीलिअर व जातीच्या दाखल्याची गरज असते. देवरी उपविभागीय कार्यालयाला आमगाव, सडक/अर्जुनी व देवरी या तीन तालुक्याच्या विद्यार्थी व नागरिकांचा सबंध येतो. परंतु देवरी येथील उपविभागीय कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांना अर्ज दाखल केल्यापासून तीन महिन्याच्यानंतरही नॉन क्रिमीलिअर किंवा जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. उलट या कार्यालयात आपले प्रमाणपत्र आणण्यासाठी गेलेल्या अर्जदारांना तेथील कर्मचारी असभ्य वागणूक देतात. सोबतच तीन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटूनही त्या अनेक उमेदवारांना नॉन क्रिमीलिअर व जातीचे दाखले न दिल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो उमेदवार पोलीस भरतीपासून वंचित राहिले आहेत. तीन महिन्यापासून हजारो अर्ज दाखल करण्यात आले परंतु या कार्यालयातून सबंधीत तहसील कार्यालयाला एकही तयार झालेला प्रमाणपत्र पाठविण्यात आला नाही.

ज्या उमेदवारांनी तहसील कार्यालयामार्फत अर्ज दाखल केला. तो अर्ज आवक-जावक रजिस्टरमध्ये नोंद करून उपविभागीय कार्यालयात आला. मात्र या अर्जावर विचार झालाच नाही. परिणामी हजारो विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमीलिअर व जातीचे प्रमाणपत्र उपविभागीय कार्यालयात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेल्या आहेत. ज्याला गरज असेल तो स्वत: उपविभागीय कार्यालयात येईल असे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नाईलाजास्तव अडलेल्या हरीला येथील गाढवांचे पाय धरावे लागते. उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हजारो अर्जदारांचे अर्ज कोपऱ्यात कचऱ्याच्या ठिकाणी फेकले आहेत. कुणाचा कागद कुणाच्या अर्जाला लावलेला आहे. जो तो येतो या अर्जाची टेहाळणी करून आपला अर्ज बाहेर काढून लिपीक महिलेला देतो. त्या अर्जावर स्वाक्षरी आणण्याची प्रक्रिया नंतर केली जाते. परंतु तीन महिन्यापासून आलेल्या अर्जाला अर्जदाराशिवाय कचऱ्याच्या ढिगाऱ्यातच राहावे लागते. पैसे घेतल्याशिवाय अर्ज करणाऱ्या बेरोजगारांना नॉन क्रिमीलिअर अथवा जातीचे प्रमाणपत्र दिल्या जाते नाही. तीन-तीन महिने लोटूनही अर्जदारांना त्यांचे दाखले न देता पैसे दिल्याशिवाय त्यांचे काम होत नाही. हा प्रकार उपविभागीय कार्यालय देवरी येथे सुरू आहे. उपविभागीय कार्यालयमार्फत अर्जदारांचे नॉन क्रिमीलिअर सबंधीत तहसील कार्यालयाला पाठविले जात नसल्याने प्रत्येक अर्जदार आपल्या नॉन क्रिमीलिअर किंवा जातीच्या प्रमाणपत्रासाठी येथे उपस्थित होतो. परंतु त्यांनाही दिवसभर वाट पहावी लागते. जे पैसे देत नाही, त्यांचे काम होत नाही. ज्यांनी टेबलाखालून पैसे दिले त्यांचे तेथील कर्मचारी त्वरीत करतात. या दाखल्यांसाठी येणाऱ्या बेरोजगारांवर तेथील नायब तहसीलदार व लिपीक ताव दाखवत असतो.