धर्म काटे लावून धान खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:27+5:30
गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड केली जाते. रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी व मळणी परिसरात सध्या सुरू झालेली आहे. रब्बी हंगामातील धान पीक विक्रीसाठी तयार होत आहे. नुकतीच राज्य शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी सध्या बंद आहे.

धर्म काटे लावून धान खरेदी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये व शेतकऱ्यांची हयगय होऊ नये, धान खरेदीच्या कामाला गती अधिक मिळावी. याकरीता जिल्ह्यातील संपूर्ण धान्य खरेदी केंद्रावर धर्म काटे लावून धान्य खरेदी करण्यात यावी. अशी मागणी जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी खा.प्रफुल्ल पटेल व जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर धान पिकाची लागवड केली जाते. रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी व मळणी परिसरात सध्या सुरू झालेली आहे. रब्बी हंगामातील धान पीक विक्रीसाठी तयार होत आहे. नुकतीच राज्य शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी सध्या बंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये व शेतकऱ्यांची हयगय होऊ नये, धान खरेदीच्या कामाला गती अधिक मिळावी.याकरीता जिल्ह्यातील संपूर्ण धान्य खरेदी केंद्रावर धर्म काटे लावून धान्य खरेदी करण्यात यावी. जेणेकरून वजन काटे लवकर होईल व गर्दी नियंत्रित करता येईल.
खरेदी केंद्रावर धर्म काट्याच्या माध्यमातून खरेदी करण्यात यावी अशी मागणी जि.प.सदस्य सदस्य किशोर तरोणे यांनी खा. प्रफुल्ल पटेल व जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे. नवेगावबाध येथे अगदी खरीदी केंद्राच्याजवळच ३ धर्म काटे आहेत.
शेतकरी स्वत: आपला धान या धर्म काट्यावर वजन करून स्वत:च्या खर्चाने आणण्यास उत्सुक आहे. तसेच ही प्रणाली अवलंबली तर एकाच दिवशी हजारो क्विंटल धानाचा काटा करणे होईल. शेतकरी वर्गाला वाट बघावी लागणार नाही. सोशल डिस्टिन्सिंगची समस्या सुध्दा निर्माण होणार नाही.