शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

सदरमध्ये ‘द बर्निंग कार'

By admin | Updated: November 17, 2016 03:03 IST

गॅरेजमधून कार दुरुस्त करून घेऊन जात असताना कारच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे भररस्त्यातच आग लागली.

सुदैवाने चालक बचावला नागपूर : गॅरेजमधून कार दुरुस्त करून घेऊन जात असताना कारच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे भररस्त्यातच आग लागली. या आगीत स्कोडा कार संपूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता सदर पोलीस ठाणे हद्दीतील पूनम चेंबर चौकात घडली. बर्निंग कार बघण्यासाठी नागरिकांनी बरीच गर्दी केल्यामुळे काही वेळापर्यंत वाहतूक खोळंबली होती. एका गॅरेजमध्ये अक्रम खान हे नवीन स्कोडा आॅक्टिवा कार घेऊन सदरमधील दुरुस्तीसाठी जात होते. आज बुधवारी दुपारी ३ वाजता कार दुरुस्त झाली. गॅरेजमधील मेकॅनिकने टेस्ट ड्राईव्हसाठी कार बाहेर काढली. मात्र, इंजिनमधील वायरिंगमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्याने पूनम चेम्बर चौकात कारची गती कमी केली. दरम्यान कारच्या इंजिनमधून धूर निघताना दिसला. त्या चालकाने कारमधून उडी घेऊन पळ काढला. काही मिनिटाच्या अवधीत संपूर्ण कारने पेट घेतला. भररस्त्यात जळत असलेली कार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एकाने अग्निशमन विभागाला सूचना दिली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळावर पोहचून आगेवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कारमालकाचे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.(प्रतिनिधी)