विदेशातून परतणाऱ्यांनी वाढविले जिल्हावासीयांचे बीपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:27+5:30

जिल्ह्यात विदेशातून येणाऱ्यांचा ओघ सुरूच असल्याने कोरोना बाधितांच्या आकड्यात दररोज वाढ होत आहे. शनिवारी (दि.११) आढळलेल्या एकूण ७ बाधितांमध्ये आमगाव व गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी १ तर उर्वरित ५ रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहे. यापैकी ४ कोरोना बाधित हे दुबईहून परतलेले आहे. तर १ रुग्ण भूतनाथ वॉर्डातील असल्याची माहिती आहे.

BP of district residents increased by those returning from abroad | विदेशातून परतणाऱ्यांनी वाढविले जिल्हावासीयांचे बीपी

विदेशातून परतणाऱ्यांनी वाढविले जिल्हावासीयांचे बीपी

Next
ठळक मुद्दे७ कोरोना बाधितांची भर । ७ बाधित झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने कोरोना बाधितांचा आकडा व्दिशतक पार झाला आहे. त्यातच दुबई, मुंबई, गुजरात येथून येणाऱ्या नागरिकांमुळे दररोज कोरोना बाधितांची भर पडत असल्याने जिल्हावासीयांचा बीपी वाढविला आहे. शनिवारी (दि.११) तिरोडा तालुक्यातील गराडा येथील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. तर ७ नवीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीयांची काळजी वाढली आहे. मात्र ७ कोरोना बाधित मुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. यांतर्गत कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने ९८ चमू गठीत करुन गंभीर आजाराच्या इतर रूग्णांचा शोध घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात विदेशातून येणाऱ्यांचा ओघ सुरूच असल्याने कोरोना बाधितांच्या आकड्यात दररोज वाढ होत आहे. शनिवारी (दि.११) आढळलेल्या एकूण ७ बाधितांमध्ये आमगाव व गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी १ तर उर्वरित ५ रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहे. यापैकी ४ कोरोना बाधित हे दुबईहून परतलेले आहे. तर १ रुग्ण भूतनाथ वॉर्डातील असल्याची माहिती आहे.
शिवाय, तिरोडा तालुक्यातील ग्राम गराडा येथील एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे गराडा गावात खळबळ उडाली असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे.
मागील ८-१० दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत असून तिरोडा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. त्यामुळे हा तालुका आता कोरोनाचे हॉटस्पाट होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा ७ कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २१० वर पोहचला आहे. तर यापैकी १४९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आतापर्यंत आपल्या घरी परतले आहेत.
३ कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५७ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने जिल्हावासीयांसाठी ही थोडी दिलासादायक बाब आहे.

कोरोना रुग्णांचा भार कर्मचाऱ्यांवर
जिल्ह्यात मागील ८-१० दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत आहे. मात्र अशात काही जबाबदार वैद्यकीय अधिकारीच रजेवर असल्याने त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांवर कोरोना रुग्णांचा भार असल्याची माहिती आहे. मात्र याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे सुद्धा दुर्लक्ष झाले आहे.

कतारहून परतलेले २५ युवक अहवालाच्या प्रतीक्षेत
तिरोडा तालुक्यातील एकूण ६४ युवक ३० जून रोजी कतारहून गोंदिया येथे परतले आहे. या सर्वांना मुर्री येथील समाजकल्याण विभागाच्या शाळेत क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. यानंतर सर्व युवकांचे स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ३९ युवकांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आल्याने त्यांना त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. मात्र २५ युवकांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल १० दिवसांचा कालावधी लोटूनही प्राप्त न झाल्याने या युवकांना तिथेच ठेवण्यात आले आहे. मात्र १० दिवसांचा कालावधी लोटूनही अहवाल प्राप्त झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

५०९५ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गांच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ५५१० स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी २१० स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ५०९५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. १४३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. ६२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

Web Title: BP of district residents increased by those returning from abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.