बोनस गेला बोगस शेतकऱ्यांच्या नावावर ! गोंदियात कोटी रुपयांचा धान घोटाळा उघड; २८ संचालकांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:47 IST2025-12-25T18:46:31+5:302025-12-25T18:47:46+5:30

१ कोटी १३ लाख ८६ हजार रुपयांचा घोळ : तीन धान खरेदी संस्थांचा समावेश, सालेकसा तालुक्यातील प्रकार

Bonus went to bogus farmers! Paddy scam worth crores of rupees exposed in Gondia; Cases registered against 28 directors | बोनस गेला बोगस शेतकऱ्यांच्या नावावर ! गोंदियात कोटी रुपयांचा धान घोटाळा उघड; २८ संचालकांवर गुन्हे दाखल

Bonus went to bogus farmers! Paddy scam worth crores of rupees exposed in Gondia; Cases registered against 28 directors

गोंदिया : शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसचा बोगस शेतकऱ्यांच्या नावावर व अकृषक जमीन कृषक दाखवून व त्याची दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या नावावर उचल करून देऊन शासनाची १ काेटी १३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सालेकसा तालुक्यातील तीन धान खरेदी संस्थेच्या एकूण २८ संचालकांवर २४ डिसेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘लोकमत’ने हे लावून धरले होते. त्यानंतर शासनाने १५ दिवसांपूर्वी याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

सालेकसा तालुक्यातील मानव बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित रामाटोला पांढरी र.जि.१११० केंद्र पाडुडदौना संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ आरोपी क्र.१ ते ७ यांनी संगनमत करून सरकारी गटाची नोंदणी अकृषक गटाची नोंदणी मूळ शेतकऱ्याच्या गटांची नोंदणी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने नोंदविणे, मूळ शेतकऱ्यांच्या वारसदाराच्या नावाची नोंदणी करणे व अशा प्रकारच्या जमिनीची नोंदणी करून तिसऱ्याच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम ६३ लाख ७५ हजार २०० रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली. तर सालेकसा सहकारी भात गिरणी संस्था मर्या. सालेकसा र.जि.११३ केंद्र कोटजभोरा संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ आरोपी क्र. ८ ते १७ यांनीसुद्धा अशा प्रकारे नोंदणी करुन ३० लाख ५६ हजार ६०० रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली. तसेच कावेरी शेती साधनसामग्री सहकारी संस्था मर्या. बाम्हणी र.जि.१०९७ केंद्र गिरोला संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ आरोपी क्र. १८ ते २८ यांनी संगनमत करून अशाच प्रकारे प्रोत्साहनपर राशी १९ लाख ५५ हजार २०० रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली आहे. या तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व संचालक मंडळ आरोपी क्र. १ ते २८ यांनी शासनाची १ कोटी १३ लाख ८६,००० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सालेकसा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक सतीश मदन डोंगरे यांच्या लेखी तक्रारीवरून सादर केलेला चौकशी अहवालावरून २४ डिसेंबर रोजी सालेकसा पोलिस स्टेशन येथे कलम ३१८ (४), ३१६ (२),३३६(३),३४० (२), ३(५) भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा केला बोनस घोटाळा

शासनाकडून दरवर्षी खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान म्हणून प्रतिहेक्टरप्रमाणे बोनस जाहीर केला जातो.
यासाठी बीम पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित संस्थांनी बोगस शेतकरी, दुसऱ्या शेतकऱ्याचे सातबारा क्रमांक, नमुना आठ जाेडून व अकृषक जमिनी कृषक दाखवून त्यावर या संस्थांनी बोनसचा लाभ मिळवून दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सालेकसा तालुक्यातील १३ संस्था रडारावर

गेल्या खरीप हंगामात सालेकसा तालुक्यातील १३ धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी ६ कोटी रुपयांवर बोनसच्या रकमेची उचल केल्याचे माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागविलेल्या माहितीत पुढे आले होते. हे प्रकरण ‘लोकमत’नेसुद्धा लावून धरले. यानंतर शासनाने याची दखल घेत १३ संस्थांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. चौकशीत ३ संस्थांनी घोळ केल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी ३ संस्थांच्या २८ संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन संस्थांच्या संचालकांवर गुन्हा दाखल

कैलास रामकुमार अग्रवाल, विनोद रामस्वरूप अग्रवाल, रूपचंद अनंतराम मोहारे, रमेशकुमार रामकुमार अग्रवाल, लोकनाथ लक्ष्मण पटले, रमेशकुमार राकडुजी अंबादे, कमलादेवी रामकुमार अग्रवाल, बाबूलाल नत्थुजी उपराडे, मनोज दसाराम इडपाते, मारोतराव दसाराम मेंढे, गुमानसिंग हनुमानसिंग उपराडे, जग्गनाथसिंह कैन्हयसिंह परिहार, गादीप्रसाद धनलाल भगत, सावलराम नारायण बहेकार, डिगीराम बक्षी मेश्राम, सुलोचना ऋषीलाल लिल्हारे, कलाबाई संगमलाल खजुरीया, लक्ष्मण किसनलाल नागपुरे, लिखीराम बालू दमाहे, सुखदास मुलचंद उपराडे, भोलेश्वर छोटेलाल नागपुरे, दालचंद श्रीचंद मोहारे, उमाप्रसाद कुसनलाल गौतम, अमृतलाल सेवादास लिल्हारे, भरतलाल नागपुरे, देवकीबाई लक्ष्मण नागपुरे, ऊर्मिलाबाई लिखीराम दमाहे, तुरसाबाई सुखदास उपराडे यांचा समावेश आहे.

Web Title : गोंदिया अनाज घोटाला: फर्जी किसानों ने बोनस हथियाया; 28 निदेशक बुक

Web Summary : गोंदिया में एक बड़े अनाज घोटाले में किसानों के लिए ₹1.13 करोड़ फर्जी भूमि रिकॉर्ड का उपयोग करके निकाल लिए गए। जांच में घोटाले का खुलासा होने के बाद तीन अनाज खरीद संगठनों के अट्ठाईस निदेशकों पर धोखाधड़ी का मामला दर्ज किया गया है।

Web Title : Gondia Grain Scam: Bogus Farmers Grab Bonus; 28 Directors Booked

Web Summary : A massive grain scam in Gondia saw ₹1.13 crore meant for farmers siphoned off using fake land records. Twenty-eight directors of three grain procurement organizations have been booked for fraud after an investigation revealed the scam.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.