Bike accident two serious injured | काळी पिवळीची दुचाकीला धडक : दोन गंभीर
काळी पिवळीची दुचाकीला धडक : दोन गंभीर

आमगाव: भरधाव काळी पिवळी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१०) रात्री आठ वाजता तालुक्यातील धम्मगिरी परिसरात घडली.  ज्ञानेश्वर मेश्राम (रा.मुल्ला ता.देवरी, २७) व रामकुमार कुथीर (रा. मुल्ला, ३४) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहे. जखमींनी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार ज्ञानेश्वर आणि रामकुमार हे दोघेही मूल्यावरून कुनपा येथे मंडईला जात होते. दरम्यान आमगावकडून भरधाव वेगाने येत असलेल्या काळी पिवळी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ज्ञानेश्वर मेश्राम हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. राजकुमार कुथीर हेसुद्धा जखमी झाले. या मार्गावरून जात असलेले आमगाव येथील मुन्ना गवळी, विक्की बेदी, सोनू ताटी, देवा बोकडे, गौरव करंडे, आकाश ठाकूर, रुषभ राऊत,ओमकुमार टेंभरे यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Bike accident two serious injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.