शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जफेड करणाऱ्या २४ हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 05:00 IST

शासनाने दोन लाखापर्यंतचे शेतकºयांचे कर्जमाफ केले. पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुठलीच सवलत दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. तर शासनाकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच योजना जाहीर केले जाईल असे सांगितले जात होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहान अनुदान देण्याची घोषणा केली.

ठळक मुद्दे५० हजार रुपयांचे प्रोत्साहन । कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शुक्रवारी (दि.६) मांडलेल्या अर्थसंकल्पात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहान देण्याची घोषणा केली.याचा लाभ जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्यां२४ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ केले. यासाठी जिल्ह्यातील २९ हजार ७६ शेतकरी पात्र ठरले. यापैकी २३ हजार १५६ शेतकºयांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.शासनाने दोन लाखापर्यंतचे शेतकºयांचे कर्जमाफ केले. पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुठलीच सवलत दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. तर शासनाकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच योजना जाहीर केले जाईल असे सांगितले जात होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहान अनुदान देण्याची घोषणा केली. दोन लाख रुपयांच्यावरील कर्ज असणाऱ्यां  शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करुन उर्वरित रक्कम सदर शेतकऱ्याला भरावी लागेल अशी घोषणा केली. या अंतर्गत जिल्ह्यातील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २३ हजार ८६ आणि राष्ट्रीयकृत बँकाचे १ हजार ७८ शेतकरी पात्र ठरणार आहे. या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहानपर योजनेचा लाभ मिळणार आहे. तर दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांची यादी तयार केली असून आता लवकरच शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड केली जाणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी