शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ सुरक्षारक्षकांनी घेतले उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 01:31 IST

बिरसी विमानतळावर कार्यरत सुरक्षारक्षकांनी विमानतळ प्रशासनाविरोधात आपल्या मागण्यांना घेऊन १ फेबु्रवारीपासून साखळी उपोषण सुरु केले होते.

एसडीओ कार्यालयात समन्वय बैठक : विनोद अग्रवाल यांची मध्यस्थीगोंदिया : बिरसी विमानतळावर कार्यरत सुरक्षारक्षकांनी विमानतळ प्रशासनाविरोधात आपल्या मागण्यांना घेऊन १ फेबु्रवारीपासून साखळी उपोषण सुरु केले होते. याची दखल घेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी विमानतळ प्रशासन व जिल्हा प्रशासनासोबत सुरक्षारक्षकांची समन्वय बैठक आयोजित करुन त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्तीने त्यांच्या प्रश्न निकाली लागला. ६ फेबु्रवारी रोजी उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, विमानपतन निदेशक सुभाष प्रजापती, दडवाल सिक्युरिटीज कंपनीचे संचालक कर्नल व्ही.के. यादव, विमानतळाचे सिक्युरिटी इंचार्ज एस.के. मलीक, बिरसीचे सरपंच रवी तावाडे, सामाजिक कार्यकर्ता अनुराग शुक्ला व सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेण्यात येईल, दर महिन्याला पगारासोबत पेमेंट स्लीप दिले जाईल, कुठल्याही कारणास्तव वाद निर्माण झाल्यास सर्वप्रथम सिक्युरिटी एजेंसी व विमानतळ अधिकाऱ्यांना याची लेखी माहिती देणे व इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी आपले उपोषण मागे घेतले. विशेष म्हणजे ५ फेबु्रवारी रोजी विनोद अग्रवाल यांनी विमातळा समोर साखळी उपोषणावर बसलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मंडपाला भेट दिली. तद्नंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी राव व विमानतळ अधिकारी प्रजापती, सरपंच तावाडे यांना मंडपात आमंत्रित करुन सुरक्षा रक्षकांसोबत चर्चा घडवून आणली. यावेळी जि.प. सभापती छाया दसरे, दीपक कदम, जयंत शुक्ला, रावणवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक निंबाळकर आदी उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा व्हावी व यात सर्वच घटकांचा समावेश असावा याकरिता ६ फेबु्रवारी रोजी उपविभागीय अधिकारी राव यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेतूनच मागण्यांवर तोडगा निघाला. (शहर प्रतिनिधी)