शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

बँकांची सुरक्षा धोक्यात!

By admin | Updated: December 20, 2014 22:41 IST

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणि नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या देवरीतील राष्ट्रीयकृत आणि इतर बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकच नाहीत. त्यामुळे या बँकांच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या

सशस्त्र सुरक्षा गार्डच नाही : रिझर्व्ह बँकेच्या नियमांची ऐसीतैसी
सुशील जैन - देवरी
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणि नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या देवरीतील राष्ट्रीयकृत आणि इतर बँकांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकच नाहीत. त्यामुळे या बँकांच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत या बँकांमधील हजारो खातेदारांची ठेवही किती सुरक्षित आहे, असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहात नाही.
एकाही बँकेत बंदुकधारी सुरक्षा गार्ड दिसून येत नाही. भारतीय रिझर्व बँकेद्वारे सर्वच बँकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक खबरदाऱ्या घेण्याचे निर्देश असतानाही देवरीत मात्र कोणत्याच बँकेकडून त्यांचे पालन होताना दिजसत नाही. तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत तसेच खासगी व सहकारी बँका सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत.
मागील काही वर्षापासून तालुक्यात राष्ट्रीकृत व खासगी बँकांची झपाट्याने वाढ होत आहे. बँकेमध्ये खाते उघडण्याकरिता बँक प्रशासन ग्राहकांकडे विनवणी करीत आहे. की त्यामुळे बँकेचे टर्नओव्हर आरबीआईच्या नियमानुसार चालन राहील. जरी बँकेमधील देवाणघेवाणीची प्रक्रिया ग्राहकांसाठी सुलभ असली तरी तालुक्यातील सर्वच बँकेत ग्राहकांचे जमा असलेले करोडो रुपयांच्ळा सुरक्षेकरिता कोणतीच उचित व्यवस्था दिसून येत नाही. राष्ट्रीय बँकासोबतच खासगी बँकेच्या शाखा तालुक्यात सर्वत्र सुरू आहेत. या सर्वच बँका जरी आधुनिक कार्यपद्धतीनुसार चालत असल्या तरीपण सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना क्रीयान्वित नाही.
स्थिती ही आहे की, शहरातील सर्वच बँकांचे संचालन सुरक्षा गार्डावीनाच होताना पहायला मिळत आहे. या बँकांमध्ये सरकारी विभागासहीत ग्राहकांच्या करोडो रुपयांची देवाण-घेवाण होत असते. बँक प्रशासन ग्राहकांच्या सुविधायुक्त देवाण-घेवाणीपर्यंतच सीमित आहे. जेव्हा की रिझर्व्ह बँकेने प्रत्येक छोट्या मोठ्या बँकांच्या शाखांना सुरक्षा संबंधी सतर्क राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत. परंतु रिझर्व बँकेच्या नियमांचे पालन करताना कोणतीही बँक दिसत नाही. यामुळे ग्राहकांना आपल्या जमापूर्तिची नेहमीच काळजी लागलेली असते. उच्चतंत्रज्ञानांतर्गत कम्प्युटरद्वारा संचालित एटीएम शहरातील स्टेट बँक व बँक आॅफ महाराष्ट्र येथे कार्यरत आहे. परंतु तिथे सुद्धा सुरक्षा गार्ड दिसून येत नाही. बँक व्यवस्थापकांना सुरक्षा गार्डाविषयी विचारले असता ते सीसी टिव्ही असल्याचे सांगून पळ काढतात. परंतु सीसी टिव्ही कॅमेरे एखाद्या घटनेला थांबविण्याकरिता किती सक्षम आहेत? हे सांगण्याची गरज नाही. नॅशनल हायवेवर असलेल्या देवरी शहरात केव्हाही बँकेत मोठी अप्रीय घटना घडू शकते यात शंका नाही.