शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

जिल्ह्यात सरासरी ८०.८७ मिमी पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:00 AM

मात्र जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ५३८८.८७ मीमी पाऊस बरसल्याची नोंद असून त्याची सरासरी १६३.३० एवढी आहे. वरील आकडेवारी बघता जिल्ह्यात या सुरूवातीच्या महिन्यातच २६६८.८४ मीमी पावसाची तूट दिसत असून त्याची सरासरी ८०.८७ एवढी आहे. आजची ही स्थिती बघता व ही तूट भरून काढण्यासाठी आता जिल्ह्यात संततधार दमदार पाऊस बरसणे गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देबळीराजा चिंतातूर : महिनाभरात केवळ १६३.३० सरासरी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवघ्या राज्याला ओलेचिंब करणारा पाऊस जिल्ह्यात मात्र दडी मारून बसल्याचे दिसत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ८०५७.७१ मीमी म्हणजेच सरासरी २४४.१७ एवढा पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ५३८८.८७ मीमी म्हणजेच सरासरी १६३.३० एवढाच पाऊस बरसलेला आहे. एकंदर जिल्ह्यात अपेक्षेच्या तुलनेत २६६८.८४ मीमी पावसाची तूट असून त्याची ८०.८७ सरासरी आहे. पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतातूर आहे.यंदाचा उन्हाळा कोरोनाने गाजविला असतानाच जिल्ह्यातील तापमानानेही ४६ डिग्री पार मजल मारली होती. एकीकडे कोरोनाची दहशत तर दुसरीकडे उन्हाचे चटके खात जिल्हावासीयांनी कसाबसा उन्हाळा काढला.७ जूनपासून मृग नक्षत्र लागले व आता तरी उकाड्यापासून सुटका होणार अशी आस धरून बसलेल्या जिल्हावासीयांना मात्र पावसानेही दगा दिल्याचे दिसत आहे. मान्सून लागल्यानंतरही तुरळक पाऊस जिल्ह्यात बरसला असून अजूनही जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.आकाशात दररोज ढग दाटून येतात व निघून जातात असाच खेळ जिल्ह्यात सुरू असल्याने कधी पाऊस धो-धो बरसणार याची वाट आता सर्वच बघत आहेत. जिल्ह्याची पावसाची आकडेवारीनुसार, ३ जुलैपर्यंत ८०५७.७१ मीमी पाऊस बरसणे अपेक्षित आहे. त्याची सरासरी २४४.१७ एवढी आहे.मात्र जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ५३८८.८७ मीमी पाऊस बरसल्याची नोंद असून त्याची सरासरी १६३.३० एवढी आहे. वरील आकडेवारी बघता जिल्ह्यात या सुरूवातीच्या महिन्यातच २६६८.८४ मीमी पावसाची तूट दिसत असून त्याची सरासरी ८०.८७ एवढी आहे. आजची ही स्थिती बघता व ही तूट भरून काढण्यासाठी आता जिल्ह्यात संततधार दमदार पाऊस बरसणे गरजेचे झाले आहे.मात्र शनिवारीही (दि.४) दुपारपर्यंतच्या ढगाळ वातावरणानंतर उन्ह तापू लागल्याने पावसाने पुन्हा दगा दिला आहे. यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाची तूट निर्माण झाली असल्याने यंदा जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी७ जून रोजी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयाने मोठ्या उत्साहात खरिपाची पेरणीपूर्व कामे आटोपली.काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी करून टाकली. मात्र आता पावसाने पाठ फिरविल्याने पेरणी वाळत चालली असून अशात शेतकºयांवर दुबार पेरणीची पाळी आली आहे. कोरोनामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या व हाती पैसा नसल्याने कशी तरी जुळवाजुळव करून खरिपासाठी शेतात उतरलेल्या शेतकºयांची फजिती झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत पावसाने आपली कृपा न केल्यास मात्र दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाण्यांची जुळवाजुळव कशी करायची हीच चिंता शेतकºयांना सतावित आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक तूटजिल्ह्यात मान्सून सुरू झाल्यानंतर महिनाभरात ८०.८७ सरासरी पावसाची तूट दिसून येत असतानाच जिल्ह्यातील आठही तालुक्यांत हेच चित्र दिसून येत आहे. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक १२८.८ सरासरी पावसाची तूट दिसून येत आहे. त्यानंतर गोंदिया तालुका दुसºया क्रमांकावर असून येथे ११६.५९ सरासरी पावसाची तूट आहे. तर गोरेगाव तालुक्यात ३८.५४, तिरोडा तालुक्यात ५४.६५, देवरी तालुक्यात ७८.३१, आमगाव तालुक्यात ५९.२१, सालेकसा तालुक्यात ८९.९२ तर सडक-अर्जुनी तालुक्यात ४२.७७ सरासरी पावसाची तूट दिसून येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस