रेती तस्करांकडून तलाठ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:16+5:30

सध्या कोरोनामुळे संचारबंदी लागू असून रात्री अंधाराचा फायदा घेत हे तस्कर महसूल विभागाच्या डोळ््यात धूळ झोकून गौण खनिजाची चोरी करीत आहेत. अशात कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत असल्याने महसूल विभागाने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Attempt to kill Talatha by sand smugglers | रेती तस्करांकडून तलाठ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

रेती तस्करांकडून तलाठ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देतलाठी कुंभरे थोडक्यात बचावले : सालई मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : वाहनांची तपासणी करीत असलेल्या तलाठी पुंडलिक कुंभरे यांच्या अंगावर रेती तस्कराने ट्रॅक्टर चालवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्कतेने ते बाजूला झाल्याने जीव वाचला असून नवेवगावबांध ते सालई मार्गावर रविवारी (दि.२४) रात्री १०.३० वाजतादरम्यान ही घटना घडली. प्रकरणी तलाठी कुंभरे यांनी रविवारी (दि.२५) नवेगावबांध पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे.
येथील तलाठी कुंभरे हे तहसीलदारांच्या आदेशावरून रविवारी (दि.२४) रात्री १०.३० वाजता अवैध गौण खनिज तपासणीकरिता नवेगाव बांध ते सालई मार्गावर रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा वाहतूक परवाना तपासण्याकरिता पावरहाऊस जवळ उभे होते. याप्रसंगी येत असलेल्या ट्रॅक्टरला त्यांनी थांबायला सांगितले परंतु अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाºया ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर न थांबवता भरधाववेगात त्यांच्या अंगावर नेला. कुंभरे वेळीच बाजूला झाल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. तर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन सालईच्या दिशेने पळून गेला.
प्रकरणी कुंभरे यांनी नवेगावबांध पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत ट्रॅक्टर चालक व २ व्यक्ती ट्रॉलीत बसले होते. जीव वाचवण्याच्या दृष्टीने ते बाजूला झाल्यामुळे ट्रॅक्टरचा क्र मांक त्यांना नोंदविता आला नाही.
सदर ट्रॅक्टरचा इंजिन सिल्वर व ट्राली लाल रंगाची होत असे नोंदविले असून वाहनचालक व वाहन मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी तलाठी कुंभारे यांनी केली आहे. सध्या कोरोनामुळे संचारबंदी लागू असून रात्री अंधाराचा फायदा घेत हे तस्कर महसूल विभागाच्या डोळ््यात धूळ झोकून गौण खनिजाची चोरी करीत आहेत. अशात कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत असल्याने महसूल विभागाने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सौंदड जवळील पिपरी घाटवरून रेतीचे उत्खनन होते. सौंदड परीसरातील एका जेसीबी मशीनने रेतीचा उपसा करून ट्रॅक्टर भरले जातात. पिंपरीच्या नवीन हनुमान मंदिर व शिवमंदिर येथे रेती साठविली जाते. येथून ८-१० ट्रॅक्टर व काही डंपर मध्ये रेती भरून नवेगावबांधकडे आणली जाते. ट्रॅक्टरवाले गोंडउमरी, बोळदे व सालई या चोरेट्या मार्गाने नवेगावबांधकडे रेती आणतात. हा रस्ता निर्मनुष्य असतो व त्याचा फायदा हे रेती तस्कर घेत असून सरकारचा लाखोंचा महसूल बुडवितात.

Web Title: Attempt to kill Talatha by sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर