शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना सहायक वनसंरक्षकास अटक

By admin | Updated: June 8, 2014 23:56 IST

आरामशीन चालविण्यासाठी हप्ते बांधा अन्यथा तुमच्यावर कारवाई करील, अशी धमकी देणार्‍या सहाय्यक वनसंरक्षकास २0 हजाराची लाच घेताना भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

भंडारा एसीबीची कारवाई : मागितले होते ४0 हजार
सडक/अर्जुनी : आरामशीन चालविण्यासाठी हप्ते बांधा अन्यथा तुमच्यावर कारवाई करील, अशी धमकी देणार्‍या सहाय्यक वनसंरक्षकास २0 हजाराची लाच घेताना भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.ही कारवाई शनिवारच्या रात्री ९.५0 वाजता करण्यात आली.
सडक/अर्जुनी येथील  सुभाष साँ मिल चे मालक लोकेश सुभाष बारसागडे (३८) यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे जाऊन तक्रार केली. त्यांची स्वत:च्या सुभाष नावाने आरामशीन आहे. त्यांच्या आरामशीनमध्ये सडक अर्जुनी परिसरातील फर्निचर दुकानदारांची लाकडे कापले जातात. ५ जून २0१४ रोजी ते आपल्या आरामशीनमध्ये असताना  वनविभाग गोंदियाचे सहाय्यक वनसंरक्षक बिश्‍वास हे दुपारी त्यांच्या आरामशीनमध्ये आले. आपल्याकडे सडक अर्जुनी परिसरातील १७ ते १८ फर्निचर दुकानदार लाकडाची कटाई होते. सर्व दुकानदार हे दोन नंबरचे लाकडे आणून कटाई करीत आहेत. प्रत्येक दुकानदाराकडून प्रत्येकी २000 रुपये व तुम्ही ५000 रुपये असे एकूण ४0000 रुपये अवैध धंदे चालू  ठेवण्याकरीता मला द्यावे लागतील. अन्यथा फर्निचर दुकानदारांवर व तुमच्यावर विनापरवाना लाकडे कटाई करीत असल्याचा ठपका ठेऊन तुमच्या आरामशीनवर कारवाई करील, अशी धमकी दिली. त्यावर सुभाष म्हणाले फर्निचर दुकानदार गरीब आहेत. ते दोन नंबरचे लाकडे आणित नाही. त्यामुळे एवढे पैसे आपणास देवू शकत नाही. त्यावर  बिश्‍वास यांनी म्हणाले, जर ४0 हजार रुपये दिले नाही तर आपल्यावर कारवाई करावी लागेल अशी धमकी दिली.
त्यानंतर सुभाष बारसागडे यांनी या संदर्भात तक्रार  भंडाराच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला. यात ४0 हजारापैकी २0 हजार रूपये लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी  सहाय्यक वनसंरक्षक वर्ग-१ तपन चेतन्य बिश्‍वास (५३) याने आपल्या पदाचा दुरूपयोग करून भ्रष्ट मार्गाने स्वत:चे फायद्याकरीता तक्रारदारांकडून मागणी केली. ४0 हजार रुपये पैकी तडजोडीनंतर २0 हजार रुपये सुभाषने आपल्या आरामशीन सडक अर्जुनी  येथे दिनांक दिले. याचवेळी सापळा रचलेल्या अधिकार्‍यांनी त्याला अटक करून आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात डुग्गीपार कलम ७,१३(१)(ड) सहकलम १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ अन्वये रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली. आरोपी जवळून २0 हजार रुपये हस्तगत करण्यात आले. आरोपी तपन बिश्‍वास हा सन १९९0 साली आर.एफ.ओ. म्हणून नियुक्त झाले. सन २0१२ मध्ये सहाय्यक वनसंरक्षक या पदावर पदोन्नती झाली. तेव्हा पासून वनविभाग कार्यालय गोंदिया येथे कार्यरत आहेत. सदर कारवाई  एसीबी नागपूरचे पोलीस उपायुक्त वसंत शिरभाते,  पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते , उपाध्याय, अशोक लुलेकर, भाऊराव वाडीभस्मे, गौतम राऊत, सचिन हलमारे, पराग राऊत, अश्‍विनकुमार गोस्वामी, मनोज पंचबुद्धे, शेखर देशकर, महिला शिपाई कंगाले, चालक मनोज चव्हाण यांनी केली. (शहर प्रतिनिधी)