शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिल लाईन्समध्ये मूर्तीकारांचे झाले आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

कुंभारांचा परिसर व मुर्तींसाठी नागपूरची ‘चितारओळ’ प्रसिद्ध आहे. नागपूरवासी मूर्तींची तेथूनच खरेदी करतात. असाच काही नजारा आता येथील सिव्हील लाईन्स परिसरात बघावयास मिळत असतो. सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तीकार येत असून यंदाही मूर्तीकारांचे आगमन झाल्याचे दिसत आहे. हनुमान चौकापासून या मूर्तीकारांचे परिवार आपले बस्तान मांडून मूर्ती तयार करतात.

ठळक मुद्देगोंदियातली चितारओळ पुन्हा गजबजली, मूर्ती घडविण्यास झाली सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या ११ आॅगस्टपासून हिंदू धर्मीयांच्या मूर्ती पूजनाच्या सणांना सुरूवात होत असल्याने मूर्तिकारांचे शहरात आगमन झाले आहे. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी मुर्तीकार आपले बस्तान मांडतात. त्यानुसार, यंदाही मुर्तीकारांच्या परिवारांचे आगमन झाले असून त्यांनी मूर्ती बनविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा गोंदियातली चितारओळ गजबजली आहे.कुंभारांचा परिसर व मुर्तींसाठी नागपूरची ‘चितारओळ’ प्रसिद्ध आहे. नागपूरवासी मूर्तींची तेथूनच खरेदी करतात. असाच काही नजारा आता येथील सिव्हील लाईन्स परिसरात बघावयास मिळत असतो. सिव्हील लाईन्स परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मूर्तीकार येत असून यंदाही मूर्तीकारांचे आगमन झाल्याचे दिसत आहे. हनुमान चौकापासून या मूर्तीकारांचे परिवार आपले बस्तान मांडून मूर्ती तयार करतात. त्यानुसार यंदाही मुर्तीकारांचे आगमन झाले असून त्यांनी मूर्ती तयार करण्यास सुरूवात केली आहे.हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजनासाह मूर्तीपूजेलाही तेवढाच मान आहे. यंदा ११ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी असून तेव्हापासूनच मूर्तीपूजनाचे सण सुरू होत आहेत. तर २२ ऑगस्ट रोजी गणपती स्थापना येत असून त्यानंतर नवरात्री, शारदा, भुलाभाई, लक्ष्मीपूजन सारखे सण येतील. त्यामुळे हे मूर्तीकार आतापासूनच गोंदियात आले असून त्यांनी मूर्ती बनविण्यास सुरूवात केली आहे.मोठ्या संख्येत मूर्तीकार सिव्हील लाईन्स परिसरात येत असून हनुमान चौक ते माता मंदिर चौक हा परिसर जणू चितारओळ म्हणूनच प्रसिद्ध झाला आहे.गणरायाच्या मूर्ती बनविण्यास सुरूवातमूर्तीपूजनाच्या सणांत सर्वप्रथम जन्माष्टमी येते व त्यानंतरच अन्य मूर्तीपूजनाचे सण येतात. येत्या ११ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी येत असल्याने मूर्तीकार कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे, कृष्णाच्या तुलनेत गणपतीचे ऑर्डर जास्त राहत असल्याने ते कृष्णाच्या मृर्ती बनविण्यासोबतच गणरायाच्या मूर्ती बनवित आहेत.

टॅग्स :ganpatiगणपती