पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:46+5:30

पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन कठोर शिक्षा द्यावी, अतिक्रमण व वन जमिनीचे पट्टे कब्जाधारकाच्या नावावर करा, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करा, जिल्ह्यात तातडीने कामे सुरु करा, मनरेगा मजुरांना ५०० रुपये प्रति दिवस मजूरी लागू करा, आवास योजना अंतर्गत ग्रामीण व शहरींना समान पाच लाख रुपये आवासकरिता द्या, शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मासीक पेन्शन कायदा करा,

Arrest Panseren's killers | पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा

पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय शेतमजूर युनियन : जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा द्या यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय शेतमजूर युनियनच्यावतीने गुरूवारी (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन कठोर शिक्षा द्यावी, अतिक्रमण व वन जमिनीचे पट्टे कब्जाधारकाच्या नावावर करा, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करा, जिल्ह्यात तातडीने कामे सुरु करा, मनरेगा मजुरांना ५०० रुपये प्रति दिवस मजूरी लागू करा, आवास योजना अंतर्गत ग्रामीण व शहरींना समान पाच लाख रुपये आवासकरिता द्या, शेतमजूर व गरीब शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मासीक पेन्शन कायदा करा, दुष्काळग्रस्त शेतकरी प्रमाणे शेतमजूरांना वर्षाला सहा हजार रुपये लागू करा, ६० वर्षावरील सर्व मजुरांना सहा हजार रुपये पेन्शन कायदा करा, प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत नगरपालिका, रेशनकार्डवर सर्व शेतमजुरांना एक रुपये दराने धान्य देण्यात यावे, एपीएल-बीपीएल भेद बंद करा, शेतमजुरांच्या मुलांना चांगले शिक्षण डिग्रीपर्यंत मोफत द्या आणि आरोग्य सेवा सर्वांना द्या, प्रधानमंत्रीद्वारे सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी शेतकºयांना देण्याच्या घोषणांवर अंमल करा, जिल्ह्यातील अतिक्रमणधारक घर बांधून अनेक दिवसांपासून राहत आहेत त्यांना आवास मंजूर करण्यात यावे, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक ओबीसींवरील अत्याचार बंद करावे आदि मागण्यांचा समावेश असून त्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी हौसलाल रहांगडाले, शेखर कनोजिया, रामचंद्र पाटील, छन्नू रामटेके, प्रल्हाद उके, चरणदास भावे, नत्थू मडावी, रायाबाई मारगाये व अन्य उपस्थित होते.

Web Title: Arrest Panseren's killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा