शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी-मोरगाव तालुका दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील एक रु ग्ण तालुक्यातील ग्राम अरूणनगर येथील त्याच्या सासुरवाडीत येऊन गेल्याने गुरूवारपासून (दि.२१) अरुणनगर परिसर कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच गुरूवारी (दि.२१) रात्रीपर्यंत तालुक्यात सुमारे २५ नवीन रु ग्ण आढळून आल्याने संपूर्ण तालुकावासी दहशतीत जगत आहे.

ठळक मुद्देरूग्ण आढळल्याने भीती वाढली : करांडली व अरूणनगर कंटेन्मेंट झोनमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या सावटाखाली जगत आहे. त्यात गोंदिया जिल्ह्यात सुमारे ३० च्या घरात रूग्ण निघून आले आहेत. त्यातील सर्वाधिक रूग्ण तालुक्यातील असल्याने तालुकावासीयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात नागरिकांना घराबाहेर पडण्यास भीती वाटू लागली आहे.मुंबईला रोजगारासाठी गेलेले सुमारे ५४ मजूर १५ मे रोजी ट्रकने जिल्ह्यातील आपापल्या स्वगावी पोहोचले. त्यापैकी ग्राम करांडली येथील एक मजूर कोरोनाबाधित निघाल्यामुळे करांडली परिसर कंटोनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला.तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील एक रु ग्ण तालुक्यातील ग्राम अरूणनगर येथील त्याच्या सासुरवाडीत येऊन गेल्याने गुरूवारपासून (दि.२१) अरुणनगर परिसर कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच गुरूवारी (दि.२१) रात्रीपर्यंत तालुक्यात सुमारे २५ नवीन रु ग्ण आढळून आल्याने संपूर्ण तालुकावासी दहशतीत जगत आहे. तालुक्यात रब्बी हंगामात धान पीक घेण्यात आले असून कापणी, बांधनी व चुरणी अशी शेतीची कामे सुरू आहेत.काही दिवसांवर खरीप हंगामा असून पूर्वमशागत सुरू होणार आहे. अशा स्थितीत तालुक्यात बाधित रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेची भर पडत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी बुधवारी (दि.२०) कंटोनमेंट झोन असलेल्या ग्राम करांडली व अरु णनगर येथे भेट देऊन पाहणी केली व आपत्कालीन समिती तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करीत या काळात घ्यावयाची काळजी तसेच नागरिकांना सहकार्य करण्यास सांगीतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या